जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मुलीला वाचवण्यासाठी बाबा बनले Superhero, Video मध्ये पाहा कसा वाचवला जीव

मुलीला वाचवण्यासाठी बाबा बनले Superhero, Video मध्ये पाहा कसा वाचवला जीव

मुलीला वाचवण्यासाठी बाबा बनले Superhero, Video मध्ये पाहा कसा वाचवला जीव

प्रत्येक मुलीसाठी तिचे बाबा हे Superhero असातात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झालेला व्हिडीओ देखील तसाच आहे.

  • -MIN READ Trending Desk Viralimalai,Pudukkottai,Tamil Nadu
  • Last Updated :

    मुंबई, 2 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (viral Video) होतात. काही व्हिडिओ कॉमेडी (Comedy) असतात तर काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. हल्ली तर अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या संदर्भात ‘झी न्यूज हिंदी’नं वृत्त दिलंय. काय आहे व्हिडीओ? या व्हिडिओमध्ये एक कार (Car) भरधाव वेगाने रस्त्यावरून जाताना दिसत आहे. कार गेल्यानंतर काही सेकंदांनी दुसऱ्या दिशेकडून एक मुलगी सायकलवरून (Cycle) येताना दिसते; पण तिच्या सायकलचा स्पीड खूप जास्त आहे. ती त्याच स्पीडने पुढे येत असते. पुढे दोन-तीन जण उभे असतात आणि तिथे एक खांबही असतो. ती मुलगी इतक्या वेगात असते की ती सायकल थांबवणं तिच्यासाठी जवळजवळ अशक्य होतं. त्याच वेगाने ती पुढे येत एका लोखंडी खांबाला धडकणारच असते इतक्यात तिचे वडील धावत तिथे पोहचतात आणि मुलीला सायकलवरून उचलून घेतात. अगदी डोळ्याची पापणी लवण्याच्या आधी हा संपूर्ण प्रकार घडतो. ज्या वेगाने ती मुलगी येत असते ते बघून पुढच्या क्षणी ती खांबाला धडकलीये असं वाटू लागतं. पण तिच्या वडिलांनी राखलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात (Accident) होण्यापूर्वी ती मुलगी बचावते. काही क्षण तर आपण जे पाहिलंय ते खरंच आहे की नाही, असा विश्वास आपल्याला बसत नाही, इतकी थरारक घटना अवघ्या काही सेकंदात घडून जाते.

    जाहिरात

    महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलीचा मोठा अपघात होण्यापासून वाचला आणि तिला कोणतीही दुखापत झाली नाही. हा थरारक व्हिडिओ पाहिल्यावर वाटतं की त्या मुलीचे वडील तिथे नसते किंवा त्यांचं तिच्याकडे लक्ष नसतं तर तिचा किती भीषण अपघात झाला असता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झालाय. तसेच या व्हिडिओला खूप व्ह्यूजदेखील मिळत आहेत. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि हजारो लोकांनी व्हिडिओला लाईकदेखील केलं आहे. अनेक जण हा व्हिडिओ शेअर करत आहेत. भिंतीतून टपकत होतं रक्त, फरशी-दरवाजेही झाले लालभडक; घरमालकाने सांगितलं घरातील धक्कादायक सत्य अनेक युजर्स हा व्हिडिओ पाहून कमेंट्स (Comments) करत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. काही लोक मुलीच्या वडिलांना सुपरहिरो म्हणतायत तर काही ती मुलगी लकी असल्याचं म्हणतायत. एकूणात काय ती मुलगी वाचली याचा आनंद हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना झाला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात