ब्राझिलिया, 01 ऑगस्ट : भिंतीतून टपकणारं रक्त, फरशी आणि दरवाजेही रक्ताने माखलेले… तुम्हाला हा फिल्ममधील एखादा क्रिमिनल किंवा हॉरर सीन वाटेल. पण प्रत्यक्षात घडलेली घटना. एका मुलीने आपल्या घरातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर लोकांनी याचा संबंध भूतप्रेताशी जोडला. अखेर या घराची मालक असलेल्या या मुलीने यामागील धक्कादायक कारण सांगितलं. ब्राझीलमधील एका घरातील भिंती, फरशी आणि दरवाजे रक्ताने माखलेलेल असल्याचा दावा करण्यात आला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. घरातील भिंतीतून रक्त वाहत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला धडकी भरली. अखेर हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या मुलीने एका ब्राझीलियन टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत यामागील कारण सांगितलं. आज तक ने डेली स्टारच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार मुलीने स्वतःच आपल्या घरातील व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तेव्हा लोकांनी त्याचा संबंध भूतप्रेताशी जोडला. शेवटी तिने यामागील नेमकं कारण सांगितलं. हे वाचा - लग्नाआधी प्रेयसीने स्वतःचं घर घेतल्यानं प्रियकरानं तोडलं नातं; संपूर्ण प्रकरण जाणून बसेल धक्का मुलीने सांगितलं, तिच्या वडीलांच्या पायांना व्हस्युकलरची समस्या आहे. त्यामुळे रक्त घरात पसरलं असावं. रक्त भिंतीतून वाहत नव्हतं तर एका जागी जमा झालेलं होतं. टाइल्स, भिंतीच्या खालच्या भागावर होतं. आपल्या वडिलांच्या पायातून रक्त का निघतं आहे, हे तापसण्यासाठी त्यांना डॉक्टरांना दाखवणार असल्याचंही या मुलीने सांगितलं. इन्स्टिट्यूट ऑफ क्रिमिनल सायन्सेसज ऑफ लंडनच्या संचालिका लुसियानो बुचार्ल्स यांनी सांगितलं की, त्यांच्या टीमपैकी कोणत्याही व्यक्तीला या मुलीच्या घरी बोलावण्यात आलं नाही. जर बोलावलं केलं तर या प्रकरणाचा तपास होईल. हे वाचा - Fact Check : गाडीवर लिंबू-मिरची लावल्यावर 5 हजाराचा दंड? अखेर सत्य आलं समोर दरम्यान या घटनेबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना मुलीच्या वडिलांच्या पायातून रक्त निघत असावं हे मानलं आहे. तर काही जणांच्या मते, हा मुलीचा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. तर काहींच्या मते, हे भुताचंच प्रकरण असावं पण मुलगी ते लपवत आहे, असं म्हणत घराला भुताचं घर म्हटलं आहे. याचदरम्यान मुलीच्या कुटुंबाने आपल्याला घरातून पळण्यास भाग पाडल्याचा दावा केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.