• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Shocking! धड गायब, मध्यरात्री रस्त्यावरून पळताना दिसले फक्त 2 पाय; Video पाहून फुटेल घाम

Shocking! धड गायब, मध्यरात्री रस्त्यावरून पळताना दिसले फक्त 2 पाय; Video पाहून फुटेल घाम

फोटो सौजन्य - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब

फोटो सौजन्य - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब

धडाशिवाय रस्त्यावर धावणारे पाय कॅमेऱ्यात कैद झाले.

 • Share this:
  मुंबई, 16 ऑगस्ट : सोशल मीडियावर भूताचे (Ghost video) बरेच हॉरर व्हिडीओ (Horror Videos) व्हायरल होत असतात. पांढरे कपडे घालून कुणी तरी रस्त्यात फिरतं आहे किंवा अंधारात पांढरी आकृती दिसली असे बरेच जण सांगतात (Real Horror Videos). सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात धडाशिवाय दोन पाय रस्त्यावरून पळताना दिसले आहेत (Legs Without Body Spotted). कमरेच्या वरील भाग गायब आणि फक्त पायच चालताना दिसले, हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. व्हिडीओत पाहू शकता, रस्त्यावर पूर्ण अंधार आहे. तिथं एक कुत्रा आहे. कुत्र्याला काहीतरी दिसतं, तेव्हा तो भुंकू लागतो आणि भीतीने मागेही होतो. इतक्यात तिथून काहीतरी पळताना दिसतं. दोन पाय पळताना दिसत आहेत. पांढरी पँट घातलेले हे पाय आहेत. पण फक्त पायच आहेत. कमरेपासून वरील शरीराचा भाग गायब आहे. हे वाचा - मासे पकडता पकडता समोर आली मगर आणि... धडकी भरवणारा VIDEO The Hidden Underbelly 2.0 युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअऱ करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. अनेकांना हा व्हिडीओ फेक वाटत आहे. हा एखादा प्रँक असावा असं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. व्हिडीओचा सोर्स समजलेला नाही. पण  नेटिझन्स शॉक झालेत.
  Published by:Priya Lad
  First published: