मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापाचं पोटच्या लेकासोबत भयानक कृत्य; VIDEO पाहून नेटिझन्स भडकले, व्यक्त केला संताप

बापाचं पोटच्या लेकासोबत भयानक कृत्य; VIDEO पाहून नेटिझन्स भडकले, व्यक्त केला संताप

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

वडील आणि मुलाचा हा व्हिडीओ पाहून सर्वांना धडकी भरली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 25 नोव्हेंबर : सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. दीर-वहिनी, आजी-नातू, आई-मुलगी अशा कितीतरी नात्यांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अशाच एका बापलेकाच्या व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहूनच धडकी भरेल. वडिलांनी आपल्या मुलासोबत भयानक कृत्य केलं आहे. वडील-मुलाचा हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स भडकले आहेत. सर्वांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुलं म्हणजे पालकांचा जीव असतात. पण अशाच जीवासोबत या वडिलांनी नको तो खेळ केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता छताला एक बलून लटकलेला दिसतो आहे. तो बलून काढायचा आहे. तो काढण्यासाठी वडिल आपल्या चिमुकल्या मुलाची मदत घेतात. पण ज्या पद्धतीने ते त्याला बलून काढायला लावतात ती पद्धत पाहूनच धडकी भरेल. वडील मुलाला आपल्या दोन्ही हातात उचलतात आणि हवेत भिरकवतात. मुलाला ते वर फेकतात. त्याच क्षणी आपल्या काळजाचा ठोका चुकतो.

हे वाचा - VIDEO - बंद लिफ्टमध्ये तरुण काढत होता छेड; एकट्या तरुणीने तिथंच केला त्याचा 'गेम'

मुलाचं डोकं त्या फुग्याला आपटतं आणि तो फुगा आपल्या दोन्ही हातात घेऊन खाली पडतो. सुदैवाने त्याचं डोकं फुग्यालाच आपटलं, त्यावेळी फुगा फुटला नाही किंवा फुग्याऐवजी छताला तो दुसरीकडे कुठे आपटला नाही. नाहीतर त्याला गंभीर दुखापत झाली असती. कदाचित त्याचा जीवही गेला असता.

@TheBest_Viral ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आईला सांगू नको, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. अवघ्या तीन सेकंदाची ही क्लिप आहे पण पाहूनच धडकी भरते. वडिलांनी मुलासोबत केलेल्या अशा कृत्यामुळे नेटिझन्स हैराण झाले आहेत. मुलाबाबत चिंता व्यक्त करत काहींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी आपल्या मुलांसोबत असं करू नका, असं आवाहन केलं आहे.

हे वाचा - भारतीय व्यक्तीची मलेशियात कबर; 55 वर्षानंतर मुलाला Google मुळे लागला शोध

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

First published:
top videos

    Tags: Father, Stunt video, Viral, Viral videos