• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • पाणी नव्हे तर Fanta मध्ये शिजवली मॅगी; अजब रेसिपी पाहून चक्रावून जाल, VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ

पाणी नव्हे तर Fanta मध्ये शिजवली मॅगी; अजब रेसिपी पाहून चक्रावून जाल, VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ

दोन मिनिटात तयार होणारी मॅगी अनेकांची आवडती असते. याची चव जवळपास प्रत्येकालाच आवडते. त्यामुळे या पदार्थासोबत जेव्हा कोणी विचित्र प्रयोग करतं तेव्हा निश्चितच मॅगी लव्हर्स भडकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : जगात असे अनेक लोक असतात ज्यांना इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आणि हटके करण्याची आवड असते. सर्वांच्या फूट टेस्टही वेगळ्या असतात. मात्र, अनेकदा समोर असे काही पदार्थ येतात जे पाहून सगळेच चक्रावतात. सध्या अशीच एक विचित्र डिश समोर आली आहे. ही अजब डिश पाहून मॅगी लव्हर्स (Maggi Lovers) नक्कीच भडकतील. दोन मिनिटात तयार होणारी मॅगी अनेकांची आवडती असते. याची चव जवळपास प्रत्येकालाच आवडते. त्यामुळे या पदार्थासोबत जेव्हा कोणी विचित्र प्रयोग करतं तेव्हा निश्चितच मॅगी लव्हर्स भडकतात. लॉकडाऊनच्या काळात मॅगीसोबत अनेक निरनिराळे प्रयोग (Weird Experiment with Maggi) केले गेल्याचं पाहायला मिळालं. काहींनी यात दूध मिसळून गोड मॅगी बनवली तर काहींनी पाणीपुरीमध्ये मॅगी टाकून खाल्ल्याचं पाहायला मिळालं. सध्या एक नवा व्हिडिओ समोर आला असून यातील व्यक्ती फंटा कोल्ड ड्रिंकमध्ये मॅगी (Fanta Maggi Video) बनवताना दिसतो. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीनं पॅनमध्ये तूप टाकलं आणि यात कांदा टाकला. सोबतच हिरवी मिरची, ढोबळी मिरची, टोमॅटो याचा तडका दिला. यानंतर त्यानं फंटा कोल्ड ड्रिंकची संपूर्ण बाटली यात रिकामी केली. यानंतर फंटा उकळू लागताच हा व्यक्ती त्यात मॅगी टाकतो. वरून हळद, मीठ, कोथिंबीर आणि मसालाही टाकतो. मॅगीतील फंटा जिरू लागताच त्यात चाट मसाला आणि लिंबूचं सिझनिंग टाकून ते प्लेटमध्ये काढतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी या अजब रेसिपी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, हे पाहून तर मला सूर्यवंशममधील उलटीची आठवण झाली. तर दुसऱ्या एकानं लिहिलं, मॅगीला अशा पद्धतीने खाणं अशक्य आहे. आणखी एकानं लिहिलं, बहुतेक जगाचा शेवट जवळ आला आहे. हा व्हिडिओ Foodie_incarnate नावाच्या यूट्यूब अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत 2 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर एक लाखहून अधिकांनी लाईक केला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा वेगळा प्रयोग आवडल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी हा पदार्थ खाऊन पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: