मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सँडविच खाताच तरुणीची झाली भयंकर अवस्था; थेट ICU मध्ये दाखल, सांगितला अनुभव

सँडविच खाताच तरुणीची झाली भयंकर अवस्था; थेट ICU मध्ये दाखल, सांगितला अनुभव

व्यवसायाने नर्स असलेली लँचबरी ब्रिटनमध्ये राहाते. तिनं खाल्लेलं सँडवीच थेट तिच्या जीवावरच बेतलं

व्यवसायाने नर्स असलेली लँचबरी ब्रिटनमध्ये राहाते. तिनं खाल्लेलं सँडवीच थेट तिच्या जीवावरच बेतलं

व्यवसायाने नर्स असलेली लँचबरी ब्रिटनमध्ये राहाते. तिनं खाल्लेलं सँडवीच थेट तिच्या जीवावरच बेतलं

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : तुम्हीही अनेक असे लोक पाहिले असतील ज्यांना काही गोष्टींची अॅलर्जी (Allergy) असते. मात्र औषधं वेळच्या वेळी घेतल्यास फार काही त्रास होत नाही. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका महिलेला मात्र अतिशय भयंकर अनुभव आला. सँडविच (Sandwich Allergy) खाल्ल्याची किंमत तिला थेट रुग्णालयताच चुकवावी लागली. सँडविचची चव चाखणं महिलेला इतकं महागात पडलं की ती थेट मृत्यूच्या दारातच पोहोचली.

व्यवसायाने नर्स असलेली लँचबरी ब्रिटनमध्ये राहाते. तिनं खाल्लेलं सँडवीच थेट तिच्या जीवावरच बेतलं. महिलेला लगेचच रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अॅलर्जिक रिअॅक्शनमुळे (Allergic Reaction) तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. लोकांना असं वाटलं की तिचा जीवही वाचणार नाही.

26 वर्षाची मिया मृत्यूच्या दारात पोहोचली होती. तिला प्रत्येक दुसऱ्या गोष्टीची अॅलर्जी आहे. The Sun च्या वृत्तानुसार, तिला लहानपणापासूनच दम्याचा त्रास आहे. ती आपल्या ब्रॉयफ्रेंडसोबत कुठेतरी निघाली होती आणि तिथेच रस्त्यात तिने सँडवीच खाल्लं. सँडवीच खाताच तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. रुग्णवाहिका बोलावून तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दम्याशिवाय तिच्या आतड्यांमध्येही समस्या होती आणि अन्न पचवण्यासह तिला त्रास होतो.

आपल्या या समस्यांना कंटाळलेल्या मियाचं असं म्हणणं आहे की तिनं सप्टेंबर महिन्यात अँटीबायोटिक औषधं घेतली होती. यानंतरच तिला अॅनाफिलेक्टिक शॉक आला. त्यामुळे आता तिलाच कळत नाही की तिच्या शरीरावर कधी कोणत्या गोष्टीचा वाईट परिणाम होईल. तिला गरम पाणी, कपडे धुण्याची पावडर अशा अनेक गोष्टींची अॅलर्जी आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये तिच्या या आजारावर उपचार होऊ शकलेला नाही. खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी ती पैसे जमवत आहे.

First published:

Tags: Viral news