जाहिरात
मराठी बातम्या / Viral / घर वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जुगाड, संपूर्ण इमारतच उचलून ठेवली बाजूला

घर वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जुगाड, संपूर्ण इमारतच उचलून ठेवली बाजूला

घर वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जुगाड, संपूर्ण इमारतच उचलून ठेवली बाजूला

अडचणींमुळे खचून न जाता या शेतकऱ्याने भलताच जुगाड लावला आणि आपलं घर वाचवलं, ज्यामुळे तो सर्वत्र चर्चेत आला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई 22 ऑगस्ट : सोशल मीडिया वापरत असताना आपल्यासमोर अशा काही गोष्टी येतात. ज्याचा आपण विचार देखील केला नसावा. हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, जे लोकांना त्यांची क्रिएटिविटी आणि टॅलेंट दाखवण्याची संधी देते. तसेच येथे अनेक कॉमेडी, तसेच जुगाडू व्हिडीओ देखील समोर येतात, जे आपलं मनोरंजन करतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक जुगाड समोर आला आहे. ज्याकडे सर्वांचं लक्ष आकर्षित होत आहे. स्वत:चं घर असणं हे अनेकांचं स्वप्न असतं, तर ज्यांनी आपल्या मेहनतीने घर उभारलं आहे, त्यांच्यासाठी त्यांचं घर प्राणापेक्षा प्रिय असतं, हे तर आपल्याला माहितच आहे. तरी देखील बऱ्याचदा अशी परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे मनात नसताना देखील आपल्या आपलं घर सोडावं लागतं आणि असंच काहीस एका शेतकऱ्यासोबत झालं. परंतु या सगळ्यात खचून न जाता या शेतकऱ्याने भलताच जुगाड लावला आणि आपलं घर वाचवलं, ज्यामुळे तो सर्वत्र चर्चेत आला. या शेतकऱ्याचे घर दिल्ली-जम्मू-कटरा एक्स्प्रेस वेच्या मार्गावर येत होतं. त्यामुळे ते घर सोडणं शेतकऱ्याला गरजेचं होतं. पण त्याला आपलं घर सोडायचं देखील नव्हतं, ज्यामुळे त्याने आपलं घर वाचविण्यासाठी जुगाड तंत्रज्ञानाचा अवलंब केला, जेणेकरून घरही वाचू शकेल आणि शासकीय योजनेत कोणताही अडथळा येणार नाही. भारत माला प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. शेतकरी सुखविंदर सिंग यांची जमीनही त्यात आहे. सुखविंदर सिंग यांनी सांगितले की, त्यांचे 1.25 कोटी रुपये किमतीचे घर 2019 मध्ये तयार झाले होते. तसेच या घरात त्यांच्या आठवणी आहेत, एवढेच नाही तर हे घर बांधायला त्यांना खूप खर्च आला होता, ज्यामुळे त्यांना ते सोडायचं नव्हतं. मग काय सुखविंदर सिंग यांनी आपला देसी जुगाड वापरण्याचा निर्णय घेतला आणि ते लागले कामाला. लिफ्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी आपलं घर 250 फुटांपेक्षा जास्त हलवले. हे काम करण्यासाठी त्यांना 2 महिने लागले. वास्तविक, घर 250 फुट आणि शिफ्ट करावे लागेल, त्यानंतर घर 60 फुटांपर्यंत दुसऱ्या बाजूला वळवले जाईल. हे सगळं करण्यासाठी सुखविंदर सिंग यांना 40 लाख रुपये खर्च आला आहे. हे घर स्थलांतरित करणाऱ्या लोकांसाठी हे मोठ आव्हान होतं. ते दररोज हे घर 10 फुट पुढे ढकलत होते. असं करुन त्यांनी आतापर्यंत जवळ-जवळ 250 फुटांपेक्षा जास्त घर हलवले आहे. तुटण्यापासून वाचवलं. या कामाला बराच वेळ लागला असला तरी, यात कोणाचेही नुकसान न करता या शेतकऱ्याची इच्छा पूर्ण झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात