जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रातोरात झाला श्रीमंत! शेतकऱ्याला इथे सापडला 70 लाख किमतीचा हिरा, नशीबच चमकलं

रातोरात झाला श्रीमंत! शेतकऱ्याला इथे सापडला 70 लाख किमतीचा हिरा, नशीबच चमकलं

रातोरात झाला श्रीमंत! शेतकऱ्याला इथे सापडला 70 लाख किमतीचा हिरा, नशीबच चमकलं

पन्ना जिल्ह्यात पुन्हा एकदा एका शेतकऱ्याचं नशीब उजळलं आहे. शेतकरी आणि मनोरचे सरपंच प्रकाश मजुमदार यांना 14.21 कॅरेटचा चमकदार हिरा सापडला आहे

  • -MIN READ Madhya Pradesh
  • Last Updated :

भोपाळ 13 डिसेंबर : देश आणि जगात अनमोल हिऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात पुन्हा एकदा एका शेतकऱ्याचं नशीब उजळलं आहे. शेतकरी आणि मनोरचे सरपंच प्रकाश मजुमदार यांनी त्यांच्या पाच साथीदारांसह जरुआपूर खाजगी क्षेत्रात खाण लावली होती, ज्यात 14.21 कॅरेटचा चमकदार हिरा मिळाला आहे. प्रकाश मजुमदार यांना याआधीही सुमारे 12 हिरे मिळाले आहेत, त्यातील हा सर्वात मोठा हिरा आहे. त्यांनी साथीदारांसह मिळून हा हिरा कार्यालयात जमा केला आहे. लेट नाईट फिरणाऱ्या कपलला लावला दंड; एका ट्विटने प्रकरण पोलिसांवरच उलटलं सरपंच प्रकाश मजुमदार यांनी सांगितलं की, हिऱ्याच्या लिलावानंतर मिळालेली रक्कम ते समप्रमाणात विभागतील त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतील. तर हिऱ्याचे जाणकार अनुपम सिंग यांनी सांगितलं की, हा हिरा आगामी लिलावात ठेवण्यात येणार आहे. या वर्षातील हा सर्वात मोठा हिरा असल्याचं सांगितलं जात आहे. त्याची किंमत 70 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. शेतीत फायदा होत नसल्याचे पाहून शेतकरी प्रकाश यांनी त्यांच्या काही मित्रांसह 2019-20 मध्ये हिऱ्याची खाण उभारली. यानंतर त्यांना एकामागून एक 11 हिरे मिळाले. यामध्ये 7.44 कॅरेट, 6.44 कॅरेट, 4.50 कॅरेट, 3.64 कॅरेटसह काही छोटे हिरे सापडले आहेत. 2022 मध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत प्रकाश यांनी सरपंचपदाची निवडणूक लढवली आणि निवडणूक जिंकली. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी माती परीक्षण कार्ड, तब्बल 22 कोटी लाभार्थ्यांना झालं वाटप सरपंच झाल्यानंतर प्रकाश यांना 3.64 कॅरेटचा हिरा आणि 12 डिसेंबर रोजी सापडलेला एक हिरा असे दोन हिरे मिळाले आहेत. यावेळी सरपंचासह भारत मजुमदार, दिलीप मेस्त्री, रामगणेश यादव, संतू यादव यांचाही हिस्सा आहे. त्यांनी स्वतः खाणीत कष्ट केलं आणि कामगारांकडून काही कामं करून घेतली. यानंतर या पाचही जणांचं नशीब उजळलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: diamond , farmer
  • First Published :
जाहिरात
जाहिरात