जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी माती परीक्षण कार्ड, तब्बल 22 कोटी लाभार्थ्यांना झालं वाटप

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी माती परीक्षण कार्ड, तब्बल 22 कोटी लाभार्थ्यांना झालं वाटप

शेतातील मातीच्या उत्पादकतेबद्दल शेतकऱ्यांना माहीत असेल, त्यात कोणत्या घटकांची कमतरता आणि आणि कोणते घटक उत्पादन वाढवण्यासाठी वापरण्याची गरज आहे

शेतातील मातीच्या उत्पादकतेबद्दल शेतकऱ्यांना माहीत असेल, त्यात कोणत्या घटकांची कमतरता आणि आणि कोणते घटक उत्पादन वाढवण्यासाठी वापरण्याची गरज आहे

शेतातील मातीच्या उत्पादकतेबद्दल शेतकऱ्यांना माहीत असेल, त्यात कोणत्या घटकांची कमतरता आणि आणि कोणते घटक उत्पादन वाढवण्यासाठी वापरण्याची गरज आहे

  • -MIN READ Trending Desk Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 10 डिसेंबर :  भारत सरकारने माती परीक्षण कार्डच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना राबवली आहे. दोन टप्प्यांत देशभरातील शेतकऱ्यांना 22 कोटींहून अधिक माती परीक्षण कार्ड देण्यात आली आहेत. माती परीक्षण व्यवस्थापन योजने अंतर्गत विविध प्रकारच्या माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्याची शासनाची तरतूद आहे. आतापर्यंत 499 कायमस्वरूपी माती परीक्षण प्रयोगशाळा, 113 फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळा, 8811 लघु माती परीक्षण प्रयोगशाळा आणि 2395 ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. परिस्थिती बदलली आहे, हवामान बदलाचं आव्हानही समोर आहे आणि त्यातच माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू ठेवणं हे मोठं आव्हान आहे. आता रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता झपाट्याने कमी होत आहे, असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलंय. हेही वाचा -   ही फळं इम्युनिटीसाठी उपयुक्त; ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी असा होतो फायदा काय आहे माती परीक्षण कार्ड योजना? - शेतकऱ्यांच्या शेतातील मातीची संपूर्ण माहिती माती परीक्षण कार्डमध्ये लिहिलेली असते. - मातीत कोणत्या घटकांचं प्रमाण किती आहे आणि कोणतं पीक घ्यायचं, तसंच कोणतं खत घालायचं, याचीही माहिती लिहिलेली असते. - कार्डमध्ये शेतासाठी लागणारं पोषण/खतं याबद्दल माहिती असते. जेणेकरून शेतकरी योग्य खतांचा वापर करून जमिनीची उत्पादकता वाढवू शकतील. - सर्वात आधी, एक अधिकारी तुमच्या शेतातील मातीचा नमुना गोळा करतो. त्यानंतर माती प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवली जाते. - तिथे तज्ज्ञ ही माती तपासतात आणि मातीबद्दलची सर्व माहिती गोळा करतात. त्यानंतर ते मातीचा रिपोर्ट तयार करतात. - त्यानंतर हा रिपोर्ट शेतकऱ्याच्या नावासह एक एक करून ऑनलाइन अपलोड केला जातो. जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या मातीचा रिपोर्ट लवकरातलवकर पाहता येईल. तसंच ही माहिती त्याच्या मोबाईलवरही दिली जाते. माती परीक्षण कार्ड छापून शेतकर्‍याच्या घरी पोहोचवलं जातं. या माती परीक्षणामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल, अशी आशा सरकारला आहे आणि त्या दृष्टीने यासाठी प्रयत्न केले जात आहेत. (world most expensive grapes : 35 हजार रुपयांना एक द्राक्ष; जगात या ठिकाणी पिकते ही दुर्मीळ जात) शेतातील मातीच्या उत्पादकतेबद्दल शेतकऱ्यांना माहीत असेल, त्यात कोणत्या घटकांची कमतरता आणि आणि कोणते घटक उत्पादन वाढवण्यासाठी वापरण्याची गरज आहे, याची कल्पना असेल तर शेतकरी त्या दृष्टीने खर्च करेल. त्यामुळे त्याचा अतिरिक्त खर्चही वाचेल. शिवाय शेतातील मातीच्या उत्पादकतेनुसार कोणतं पीक घेणं, योग्य राहील, याबदद्लही तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे पिकांबद्दलही शेतकऱ्यांना स्पष्टता असेल. या सर्व गोष्टींची काळजी घेत योग्य पिकाची पेरणी केल्यास शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल आणि त्यांना नफाही मिळेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात