गुरुग्राम 14 फेब्रुवारी : एका रेस्टॉरंटने (Restaurant) दिव्यांग तरुणीला (Disabled Woman) प्रवेश नाकारल्याचा प्रकार गुरुग्राममध्ये घडला आहे. तिची व्हीलचेअर रेस्टॉरंटच्या आतमध्ये इतरांना त्रासदायक ठरू शकते म्हणून तिला बाहेर बसवण्यात आलं. ती तिच्या मैत्रिणीसोबत डिनरसाठी आली होती. सृष्टी पांडे असं या तरुणीचं नाव असून तिने घडलेला सर्व प्रकार ट्विटरवरून सांगितला आहे. त्यानंतर नेटिझन्सने रेस्टॉरंटवर संताप व्यक्त केला होता. दरम्यान प्रकरण तापल्याचं पाहून रेस्टॉरंटच्या मालकाने तिची माफी मागितली आहे. सृष्टीने १२ फेब्रुवारीला ट्विटरवर लिहिलं की, “मी काल रात्री माझी बेस्ट फ्रेंड आणि तिच्या फॅमिलीसोबत रास्ता गुडगाव रेस्टॉरंटमध्ये गेले होते. खूप दिवसानंतर ही माझी पहिलीच सहल होती आणि मला मजा करायची होती. भैयाने (माझ्या मैत्रिणीचा मोठा भाऊ) चार जणांसाठी एक टेबल विचारला. मात्र तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे दोनदा दुर्लक्ष केलं. पळून जाऊन लग्न केलं, पण पतीचा झाला मृत्यू; अचानक महिलेच्या आयुष्यात आला ट्विस्ट तिसऱ्यांदा त्याने विचारलं तेव्हा कर्मचाऱ्यांनी “व्हीलचेअर अंदर नहीं जायगी” (व्हीलचेअर आत जाऊ शकत नाही) असं उत्तर दिलं. आम्हाला आधी वाटलं की व्हीलचेअर आत प्रवेश करू शकत नाही. परंतु आम्ही मॅनेज करू असं आम्ही त्याला सांगितलं आणि एक टेबल बुक करायला सांगितलं. पण पुढे तो जे काही बोलला ते ऐकून आम्हा सर्वांना धक्का बसला. माझ्याकडे बोट दाखवत त्याने आम्हाला सांगितलं की आत ग्राहकांना त्रास होईल. असं बोलून त्याने आम्हाला प्रवेश नाकारला. मुख्य म्हणजे हा सर्व प्रकार एका फॅन्सी रेस्टॉरंटच्या (fancy restaurant) कर्मचाऱ्यांनी केला.
बराच वाद घातल्यावर त्याने आम्हाला बाहेर टेबल देऊ असं सांगितलं. बाहेर त्यांनी आमच्यासाठी जी व्यवस्था केली ती वाईट होती. बाहेर थंडी होती आणि मी जास्त वेळ थंडीत बाहेर बसू शकत नाही. जास्त थंडीत माझ्यासाठी बाहेर बसणं असुरक्षित होतं. तरीही मला बाहेर का बसवायला पाहिजे? इतर सर्वांपासून वेगळं? बाहेर टेबल पाहिजे असता तर आम्ही त्याचीच मागणी केली असती ना? शेवटी आम्हाला तिथून जाण्यास सांगण्यात आलं.”
इंजिनिअर फेल झाले, मुस्लीम सुताराने केला चमत्कार; स्थापित केलं दीड टनाचं शिवलिंग
या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या सृष्टीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “मी तुमच्यासाठी इतकी त्रासदायक आहे का? मला नेहमी छोट्याछोट्या गोष्टींसाठी भांडण का करावं लागतं? मला सार्वजनिक ठिकाणी प्रवेश का नाकारण्यात आला? माझा प्रवेश नाकारणारे ते कोण आहेत? मी बाहेर जाणं बंद करावं का? कारण वरवर पाहता माझा इतरांशी संबंध नाही. कारण मी इतरांसाठी “डिस्टर्बन्स” आहे. कारण माझ्याकडे बघून त्यांचा मूड “खराब” होतो. या प्रकरणाचं मला खूप वाईट वाटलं असून मी भयंकर दुःखी आहे. मला माझाच तिरस्कार वाटत आहे,” असं सृष्टीनं लिहिलंय. दरम्यान सृष्टीची ट्विट्स चांगलीच व्हायरल झाली आहेत. त्यानंतर रेस्टॉरंटचा मालक गौमतेश सिंग यांने ट्विटरवर माफी मागितली आहे. जे काही घडलं त्याबद्दल आम्ही दिलगिर आहोत. पुन्हा असं होणार नाही, असं सिंग यांनी म्हटलंय. दुसरीकडे राष्ट्रीय महिला आयोगाच्या (national commission for woman) अध्यक्ष रेखा शर्मा यांनीदेखील आपण या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं म्हटलं आहे.