Home /News /national /

भलेभले इंजिनिअर फेल झाले, पण मुस्लीम सुताराने घडवला चमत्कार; स्थापित केलं दीड टनाचं शिवलिंग

भलेभले इंजिनिअर फेल झाले, पण मुस्लीम सुताराने घडवला चमत्कार; स्थापित केलं दीड टनाचं शिवलिंग

जलधारीमध्ये शिवलिंग बसवताना बड्या अनुभवी अभियंत्यांना घाम फुटला तेव्हा तिथे काम करणाऱ्या मकबूल हुसेन अन्सारी या सुताराने या कामात मदत करेल, असं अधिकाऱ्यांना सांगितलं

  भोपाळ 13 फेब्रुवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) मंदसौरमध्ये जगप्रसिद्ध अष्टमुखी भगवान पशुपतीनाथ महादेव मंदिर (Pashupatinath Mahadev Temple) आहे. या ठिकाणी सहस्त्रेश्वर महादेवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. या शिवलिंगाची गोलाई आणि लांबी 6.50 फूट सांगितली जात आहे. शिवाचे हे नवीन रूप जलधारी म्हणजेच जिल्हारीमध्ये क्रेनच्या साहाय्याने बसवलं जाणार होतं. प्रशासनाने पीडब्ल्यूडी, पीएचई, जिल्हा पंचायत यासह सर्व विभागांच्या अभियंत्यांना पाचारण केलं. पण हे शिवलिंग जलधारीवर कसं आणायचं हे कोणीच सांगू शकलं नाही. यानंतर एका मुस्लीम सुताराने मंदिरात शिवलिंग बसवण्याची जबाबदारी घेतली. जलधारीमध्ये शिवलिंग बसवताना बड्या अनुभवी अभियंत्यांना घाम फुटला तेव्हा तिथे काम करणाऱ्या मकबूल हुसेन अन्सारी या सुताराने या कामात मदत करेल, असं अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर मकबूल यांनी अभियंत्यांना कल्पना दिली की बर्फावर शिवलिंग ठेवल्यास बर्फ वितळण्यासोबतच शिवलिंग हळूहळू जलधारीच्या आत जाईल. स्वप्नात आले श्रीकृष्ण भगवान; मुस्लीम व्यक्तीने 40 लाख खर्चून केलं मोठं काम मकबूल हुसेन यांची ही कल्पना सर्वांनाच आवडली आणि बर्फाची ऑर्डर देऊन गोलाकार आकारात कापून बर्फाच्या तुकड्यांवर शिवलिंग ठेवलं गेलं. मग बर्फ वितळताच शिवलिंगाने आपली जागा घेतली. आता सगळेच मकबूल हुसैन यांचं कौतुक करत आहेत. गरिबीमुळे मकबूल कधीच शाळेत गेले नाही. त्यांनी सौदी अरेबियात 8 वर्षे मेकॅनिक म्हणून काम केलं आहे. तसेच त्यांना अनेक मंदिरे बांधण्याचा अनुभव आहे. मकबूलने काही मिनिटांतच अभियंत्यांना त्रास देणारी ही समस्या सोडवली. त्यांच्या या कल्पनेमुळे जलधारीत शिव सहस्त्रेश्वर महादेवाची स्थापना झाली. मकबूल म्हणतात, की अल्लाह देव एकच आहे आणि मला खूप आनंद झाला की हे उदात्त कृत्य माझ्याकडून होऊ शकलं. हे शिवलिंग 1500 वर्षांपूर्वी दशपूरच्या होळकर सम्राटाच्या काळात चुना वाळूच्या दगडापासून बनवलं गेलं. हे शिवलिंगही शिवना नदीत सापडलं होतं. शिवना नदीतून अष्टमुखी पशुपतीनाथाची मूर्तीही सापडली. शिवलिंगासाठी जलधारी गुजरातमधून बनवण्यात आली होती. ज्याचं वजन सुमारे साडेतीन टन असून शिवलिंगाचं वजन सुमारे दीड टन आहे. या कामातील अभियंता दिलीप जोशी सांगतात की, शिवलिंगाचं वजन दीड आणि जलधारी साडेतीन टन आहे. यातील सर्वात मोठी तांत्रिक अडचण म्हणजे चारही बाजूने खांब असल्याने क्रेन आत येऊ शकली नाही. तसंच शिवलिंग दुसऱ्या क्रेनने बसवता येत नव्हतं. जलधारी रोलर पाईपच्या साहाय्याने ठेवण्यात आली होती आणि जेव्हा शिवलिंग ठेवण्याची वेळ आली तेव्हा त्याच्या दंडगोलाकारामुळे खूप त्रास झाला.

  रेल्वे स्टेशन्सची नावं पिवळ्या फलकावर का लिहिली जातात? वाचा रंजक कारण

  यामुळे शिवलिंग खालून पट्टा लावून केंद्रापर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण यातही यश आलं नाही. तेव्हा मकबूल अन्सारी यांनी सांगितलं की, त्यात दीड फूट आत बर्फ ठेवा. मग बेल्टच्या साहाय्याने हे बसवलं, आता ते अगदी योग्य पद्धतीने बसलं असून यात एक मिलिमीटरही फरक नाही. बर्फ वितळण्यासाठी सर्वत्र गरम पाणी ओतलं गेलं. या कामाला तब्बल 14 तास लागले. मकबूल भाईंनी सर्व प्रश्न सोडवले आणि हे ऐतिहासिक कार्य घडले. आम्ही सर्व खूप आनंदी आहोत, असं दिलीप जोशी म्हणाले.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Muslim, Temple

  पुढील बातम्या