जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मॅगी बनते तर 2 मिनिटात, पण तिला पचवायला शरीराला किती वेळ लागतो?

मॅगी बनते तर 2 मिनिटात, पण तिला पचवायला शरीराला किती वेळ लागतो?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

नूडल्स हा प्रकार सगळ्यांच्याच ओळखीचा आहे. वेगवेगळ्या प्रकारची,तसेच वेगवेगळ्या कंपनीची मॅगी बाजारात उपलब्ध आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 11 जानेवारी : सध्या लोकांची जीवनशैली इतकी व्यस्त आहे की त्यांना जेवण बनवण्यासाठी जराही वेळ नसतो. त्यामुळे लोक फास्ट फूड किंवा रेडी टू कूक अशा पर्यायांकडे वळतात. तसेच बाजारात पॅकेज फुडचे देखील अनक पर्याय आहेत. यामध्ये तुम्ही भातापासून ते अगदी भाजी आणि डाळीपर्यंतचे देखील पर्याय आहेत. त्यात मॅगी हा प्रकार सगळ्यांच्याच ओळखीचा आहे. वेगवेगळ्या प्रकारची,तसेच वेगवेगळ्या कंपनीची मॅगी बाजारात उपलब्ध आहे. या कंपनीकडून असे क्लेम केलं जातं की ही अगदी 2 मिनिटात बनते, जी तुमच्या पोटाची भूक मिटवू शकते. हे ही वाचा : Credit Card वापरणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड कोण करतं? अनेक लोकांसाठी मॅगी हे एक वेळेचं जेवण झालं आहे. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की, 2 मिनिटात शिजवलेले इन्स्टंट नूडल्स प्रत्यक्षात पचायला किती वेळ लागतो? बहुतेक आरोग्य तज्ज्ञ खाण्यामध्ये आरोग्यदायी आहारच खाण्याचा सल्ला देतात. मोठ्या माणसांना आपण थांबवू शकतो, पण लहान मुलांचं काय? त्यांसाठी मॅगी म्हणजे आवडीचं खाणं. पण मुलांच्या आवडीची ही मॅगी त्यांच्यासाठी हानिकारक असू शकते. चला याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात पाहू मॅगी किंवा इन्स्टंट नूडल्स खाण्याचे तोटे नूडल्स आवडणाऱ्यांची संख्या कमी नाही. नूडल्स आपली भूक शांत करतात पण आपल्या शरीराला त्यापेक्षा जास्त नुकसान करतात. मॅगीच्या एका पॅकेटमध्ये सुमारे 385 कॅलरीज असतात, ज्यामुळे शरीरातील चरबी वेगाने वाढते. या 350 कॅलरीज बर्न करण्यासाठी तुम्हाला सुमारे अर्धा तास मेहनत करावी लागेल. कॅलरीज व्यतिरिक्त, त्यात 14.6% चरबी आणि 3.4% साखर असते. हे मैदाच्या पिठापासून बनवले जाते जे पचण्यास सोपे नसते. मॅगी किंवा नूडल्स आतड्यांमध्ये अडकतात किंवा चिकटून राहातात आणि त्यामुळे यकृत आणि किडनीला सर्वाधिक नुकसान होते. मॅगी किंवा नूडल्स कोणत्या आजारांना आमंत्रण देते? जर एखाद्या व्यक्तीने रोज आहारात नूडल्सचा समावेश केला तर त्यामुळे अनेक गंभीर आजार होतात. मॅगीचे जास्त सेवन केल्याने सांधेदुखी, स्मरणशक्तीची समस्या आणि बुद्ध्यांक पातळी घसरण्याची शक्यता असते. अनेक रिपोर्ट्समध्ये इन्स्टंट कुकिंग नूडल्समध्ये शिसे किंवा ग्लास मिळण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शिसे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे आजारी बनवते. त्याच्या वापरामुळे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याची शक्यता असते.

News18लोकमत
News18लोकमत

त्यामुळे आता तुम्हीच ठरवा की तुमच्या मुलांना यापासून लांब ठेवावं की नाही. त्यात तुमची मुलं जर रोज मॅगी खात असतील, तर मग ही धोक्याची घंटा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात