मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Fact Check : वॉटर पार्कमध्ये स्लायडिंग करणाऱ्या महिलेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू? त्यावेळी नेमकं काय घडलं?

Fact Check : वॉटर पार्कमध्ये स्लायडिंग करणाऱ्या महिलेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू? त्यावेळी नेमकं काय घडलं?

जाणून घ्या त्या व्हिडीओमागील सत्य...

जाणून घ्या त्या व्हिडीओमागील सत्य...

जाणून घ्या त्या व्हिडीओमागील सत्य...

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 5 जून : सोशल मीडियावर वॉटर पार्कचा (Water Park Viral Video) एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी वॉटर स्लाइडवरुन घसरत खाली येते आणि स्वीमिंक पुलमध्ये उभ्या असलेल्या तरुणाला धडकते. यानंतर तरुणाच्या डोक्याला जबर जखम झाली आहे. स्वीमिंग पुलमध्येच तरुणाच्या डोक्यातून रक्त वाहताना दिसत आहे. असा दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ कानपूरच्या ब्लू वर्ड थीम पार्कचा आहे. या घटनेच तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचाही दावा केला जात आहे.

काय आहे सत्य? व्हायरल व्हिडीओसह केलेला दावा पूर्णपणे चुकीचा आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील कानपूर नाही तर राजस्थानमधील झालावाडचा आहे. या प्रकरणात महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ तब्बल 4 ते 5 दिवस जुना आहे. तरुण आपल्या मित्रांसह पाण्यात होता. यादरम्यान स्लाइडवरुन घसरत आलेली तरुणी पाण्यात उभ्या असलेल्या तरुणाला धडकते. यावेळी तरुणीचा वेग अधिक असल्याने तरुणाच्या डोक्याला फटका बसतो. डोक्याला जखम झाल्यामुळे तो रक्तबंबाळ होता. आणि पाण्यात बेशुद्ध पडतो. यानंतर गोंधळ उडतो. तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. येथे त्याला उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. यावरुन स्पष्ट आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबत केलेला दावा चुकीचा आहे. हा व्हिडीओ कानपूरचा नसून राजस्थानमधील झालावाडचा आहे आणि या अपघातात तरुणाचा जीव बचावला आहे.

First published:

Tags: Accident, Rajasthan, Shocking viral video

पुढील बातम्या