मुंबई 18 जानेवारी : सारा तेंडूलकर आणि शुभमन गिल या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा खूप रंगल्या. सारा आणि शुभमने अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टला लाईक-कमेंट केलं पण याबद्दल कधीही कोणतंच वक्तव्य केलं नाही. पण शुभमन गिलच्या द्विशतकानंतर एक असं ट्वीट पोस्ट झालं, ज्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. हे ट्वीट सारा आणि शुभमनच्या साखरपुडा ठरल्याची बातमी सांगणारं आहे. जे पाहून दोघांच्याही चाहत्यांना आनंद झाला. लोकांनी त्या दोघांचंही अभिनंदन केलं आहे. या ट्वीटमध्ये सारा आणि सचिनचा फोटो आहे. जे ब्रेक्रिंग न्यूज म्हणून शेअर करण्यात आलं आणि सचिन तेंडूलकने शुभमन गिल सोबत आपल्या मुलीचा म्हणजेच साराचा साखरपूडा ठरवला असल्याचं म्हटलं गेलं आहे. खरंतर शुभमन गिलने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकलं. शुभमनने अवघ्या 145 बॉलमध्ये हा कारनामा केला. शुभमन एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा पाचवा भारतीय ठरला. तसेच शुभमनने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात द्विशतक ठोकण्याचा देखील वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्याच्या या रेकॉर्ड ब्रेक खेळावर इम्प्रेस होऊन साराचं लग्न ठरवलं असल्याचं सांगितलं जात आहे.
BREAKING: Sachin Tendulkar announces daughter Sara's engagement with #ShubmanGill pic.twitter.com/tzvF6sWWD9
— HARSH (@hrsyadv) January 18, 2023
पण या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं जातंय. कारण याबद्दल सचिन, सारा किंवा शुभमनकडून कोणतंही वक्तव्य किंवा ट्वीट आलेलं नाही.
जे ट्वीट व्हायरल झालंय ते हर्षल नावाच्या एका सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करण्यात आलं आहे, ज्याचा सारा, सचिन किंवा शुभमनशी काहीही संबंध नाही. तो या दोघांचा चाहता आहे आणि त्याने शुभमनच्या खेळाला पाहून मजेदार पद्धतीचं मीम तयार केलं आहे आणि याच त्याच्या मजेदार ट्वीटला लोकांनी देखील उचलून धरलं आहे. शुभमन खरंच खूप चांगला खेळला, ज्यामुळे सचिनने इम्प्रेस होऊन आपल्या मुलीचं लग्न ठरवलं असं म्हटलं जातंय, तर एक आणखी मीम आहे, ज्यामध्ये सचिन आणि साराचा फोटो आहे आणि त्यामध्ये सचिन हा शुभमनचा खेळ पाहून साराकडे त्याची स्तुती करत आहे. ‘‘बेटा आणखी एकदा विचार कर मुलगा इतकापण वाईट नाही.’’ असं त्यामध्ये लिहिलंय