मुंबई : हनुमान जयंतीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. लोक हनुमंताचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच रांगेत उभे आहेत. सर्वच मंदिरात साधारण गर्दी पाहायला मिळत आहे. पण कानपूर येथील एका हनुमान मंदिरात अनपेक्षीत गर्दी पाहायला मिळाली आहे. यामागचं कारण आहे वायरल व्हिडीओ हनुमान मंदिरात असलेल्या हनुमानाच्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याचे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. एवढेच नाही तर मूर्तीसमोर एक पोलीस अधिकारीही दिसत आहे. या व्हिडिओनंतर येथे भाविकांची गर्दी वाढली आणि हा चमत्कार नक्की काय आहे आणि तो आपल्याला ही पाहायला मिळेल का? अशी उत्सुक्ता भाविकांमध्ये वाढली आहे. वानराने लावले माकडाच्या कानशिलात, पुढे जे घडलं ते… पाहा Video हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली. अधिकाऱ्यांनी स्वत: घटनास्थळी पोहोचून घडामोडींची चौकशी केली असता व्हिडीओतील दावे निराधार असल्याचे दिसून आले. हे प्रकरण कानपूर महानगरातील चकेरी पोलीस स्टेशन परिसरातील कोयला नगर येथील आहे. जिथे चौकीच्या आवारात हनुमान मंदिर बांधले आहे. व्हिडीओमध्ये एक पोलिस देखील दर्शानासाठी गेला असल्याने लोकांमध्ये आनखी झुंबड उडाली.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इतरपोलिसांनी त्याची मंदिराची पाहणी केली, तेव्हा त्यांना या मंदिरात असे काहीही आढळले नाही. हा दावा खोटा असल्याचं त्यांनी सांगितलं, तसेच हा व्हिडीओ कोणीतरी मुद्दाम एडिट केला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. एसीपी अमरनाथ यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी स्वतः मंदिर गाठले आणि मंदिराचे दर्शन घेतले. पण त्याला असा कोणताही पुरावा सापडला नाही. ते म्हणाले, “बजरंगबली स्वतः समस्यानिवारक आहेत, त्यामुळे असे काही होण्याची शक्यता नाही. हा व्हिडीओ कोणी व्हायरल केला आणि कोणी बनवला आणि किती प्रसारित केला, याचा तपास सुरू आहे.” त्याचवेळी त्यांनी व्हायरल व्हिडीओमधील पोलिसाशीही बोलणं झालं असल्याचे सांगितलं, पुढे ते म्हणाली की त्यांनी ही अशी कोणतीही गोष्ट म्हटलेली नाही, ते फक्त दर्शनासाठी गेले होते.