खरं आहे की खोटं : 3 मेपर्यंत टेलिकॉम कंपनी इंटरनेट फ्री देणार?

खरं आहे की खोटं : 3 मेपर्यंत टेलिकॉम कंपनी इंटरनेट फ्री देणार?

हा मेसेज तुम्हालाही आला असू शकतो. पण या मेसेजमागचं सत्य काय आहे जाणून घेऊया. खरंच फ्री देण्यात येणार आहे?

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : देशभरात कोरोनाचं संसर्ग वेगानं वाढत आहे. 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यात काळात कोरोनासोबतच आणखी एक महासंकट म्हणजे सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवांचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज फिरत आहे. भारतीय दूरसंचार विभागाच्या वतीनं लॉकडाऊनच्या काळात 3 मेपर्यंत लॉकडाऊनमुळे इंटरनेट सेवा फ्री देण्यात येणार असल्याचा दावा या मेसेजमध्ये केला जात आहे. हा मेसेज तुम्हालाही आला असू शकतो. पण या मेसेजमागचं सत्य काय आहे जाणून घेऊया. खरंच फ्री देण्यात येणार आहे की हा मेसेज खोटा आहे हे आपल्या सायबर सिक्युरिटीसाठी जाणून घेणं अत्यावश्यक आहे.

काय आहे दावा-

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये लॉकडाऊन कालावधीमध्ये 3 मेपर्यंत सर्व मोबाईल वापरकर्त्यांना इंटरनेट सेवा फ्री देण्यात येणार आहे. असा दावा करण्यात आला होता. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा असा पर्याय देण्यात आला होता. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्राहकांनी या लिंकवर क्लीक करण्यास सुरुवात केली. मात्र या पोस्टची पडताळणी केली नाही.

या पोस्टनंतर सजग ग्राहकांनी मात्र थेट दूरसंचार विभागाला यासंदर्भात विचारणा केली. हा व्हायरल असलेला मेसेज खरा आहे का? 3 मेपर्यंत इंटरनेट सेवा फ्री दिली जात आहे का? असे अनेक सवाल उपस्थित करण्यात आले.

हे वाचा-भारतात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची गरज नाहीतर..., तज्ज्ञांनी दिला इशारा

काय आहे व्हायरल पोस्ट मागचं सत्य

प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने (PIB)ने या दाव्याची सत्यता पडताळली असून ही पोस्ट खोटी असल्याचं सांगितलं आहे. 'भारतीय दूरसंचार विभागाने 3 मे पर्यंत सर्व ग्राहकांना अजूनपर्यंत फ्री इंटरनेट देण्यासंदर्भात कोणतीही घोषणा केली नाही.' अशी माहिती पीआयबीने दिली आहे.त्यामुळे हा दावा खोटा आहे असे मेसेज आल्यास फॉर्वर्ड करू नये त्यामुळे कृपया अशा अफवा आणि फसवणूक करणाऱ्या मेसेजपासून दूर राहाण्याचं आवाहन पीआयबीने केलं आहे.

भारत संचार निगम लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर एक पोस्ट करण्यात आली होती. BSNL कंपनी 5 GB डेटा फ्री देत आहे. पण ही ऑफर फक्त

बीएसएनएल हायस्पीड ब्रॉडबँड सेवा न घेतलेल्या सध्याच्या लँडलाईन ग्राहकांसाठी आहे. ही ऑफर मोबाइल वापरकर्त्यांसाठी नाही, असा दावा व्हायरल पोस्टमध्ये केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जी पोस्ट फ्री इंटरनेटबाबत व्हायरल होत आहे ती खोटी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हे वाचा-चीनमध्ये कोरोना Return; वुहाननंतर हार्बिनला धोका, सरकारकडून शहर सील

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 23, 2020, 9:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading