नवी दिल्ली, 23 एप्रिल : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या दोन टप्प्यांत 40 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. दुसऱ्या टप्प्याचा कालावधी हा 3 मेपर्यंत आहे. मात्र त्यानंतर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जगातील आघाडीच्या वैद्यकीय जर्नलचे मुख्य-संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी, भारताने लॉकडाउन हटवण्याची घाई करू नये, लॉकडाऊन किमान 10 आठवड्यांपर्यंत ठेवला पाहिजे, असे सांगितले. भारतात सध्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे जो 3 मे रोजी संपेल. 3 मेपासून लॉकडाऊन संपेल, अशी लोकांना आशा आहे.मात्र इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना रिचर्ड यांनी हा लॉकडाऊन हटवण्याची घाई करू नये असा सल्ला दिला आहे. तसेच कमीतकमी 10 आठवड्यांसाठी लॉकडाउनचा विचार करावा, असेही रिचर्ड म्हणाले वाचा- चीनमध्ये कोरोना Return; वुहाननंतर हार्बिनला धोका, सरकारकडून शहर सील आजार स्वतःच संपेल: रिचर्ड हॉर्टन रिचर्ड हॉर्टन म्हणाले की, हा आजार कोणत्याही देशात कायमस्वरूपी नाही. ते स्वतःच संपेल. भारतात कोरोना रोखण्यासाठी योग्य दिशेने कार्य केले जात आहे. ते म्हणाले की, जर लॉकडाउन भारतात यशस्वी ठरले तर आपणास दिसून येईल की कोरोना 10 आठवड्यांत संपेल. रिचर्ड हॉर्टन यांनी एका विशेष संभाषणात सांगितले की, परिस्थिती सामान्य नसल्याचे खरे आहे. आपण सामाजिक अंतर राखले पाहिजे. मास्कचा वापर केलाच पाहिजे. तसेच, एखाद्याला खासगी स्वच्छतेबद्दल खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वाचा- क्वारंटाइन म्हणजे अडकून पडणं नाही, लॉकडाऊन झालेल्या कामगारांनी पालटलं शाळेचं रुप शक्य तितक्या जास्त काळ लॉकडाऊन वाढवावा: रिचर्ड हॉर्टन भारतातील लॉकडाऊनबाबत बोलताना रिचर्ड म्हणाले की, ‘मला समजले आहे की पुन्हा आर्थिक क्रियाकलाप सुरू करावा लागेल, पण त्यासाठी घाई करू नका. जर आपण घाईघाईने लॉकडाउन उचलले आणि नंतर आपल्याकडे रोगाचा दुसरा टप्पा असेल जो पहिल्या टप्प्यापेक्षा वाईट असू शकतो. भारतात सध्या 20 हजार 471 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 652 लोकांचा मृत्यू झाला आहे. संपादन, संकलन-प्रियांका गावडे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.