खरं की खोटं : कोरोनाशी लढण्यासाठी US, UK सह 18 देशांनी मोदींना केलं प्रमुख? मेसेज होतोय व्हायरल

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला असताना सोशल मीडियावर अफवासुद्धा पसरत आहेत. त्यात आता WION न्यूजचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला असताना सोशल मीडियावर अफवासुद्धा पसरत आहेत. त्यात आता WION न्यूजचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Share this:
    मुंबई, 08 एप्रिल : सध्याच्या घडीला जग कोरोना व्हायरसशी लढत आहे. यासाठी सर्वच राष्ट्रे एकमेकांना सहकार्य करत आहेत. कोरोनामुळे मृतांचा आकडा जगभरात 80 हजारांवर पोहोचला आहे. चीन, इटली, स्पेन यांच्यानंतर आता अमेरिकेत कोरोनाने हाहाकार उडाला आहे. जगातून अशी धक्कादायक माहिती येत असतानाच सोशल मीडियावर अफवासुद्धा अनेक पसरत आहेत. त्यात आता WION न्यूजचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओवरून असा दावा केला जात आहे की, कोरोनाच्या लढ्यामध्ये जागतिक स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षपद भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे देण्यात आलं आहे. यामध्ये एकूण 18 राष्ट्रांच्या नेत्यांचा समावेश आहे असाही दावा केला जात आहे. महाराष्ट्र भाजपचे चिटणीस अतुल भाटखालकर यांनी WION न्यूजचा व्हिडिओ शेअर करत ही अभिमानाची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्यानंतर मनिपूरच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार रजस सेठी यांनीही व्हिडिओ शेअर केला आहे. अतुल भाटखालकर म्हटलं की, जागतिक नेते ट्रम्प, बोरिस जॉन्सन, स्कॉट मॉरिसन यांना वाटतं की पंतप्रधान मोदींनी या लढ्यात पुढाकार घ्यावा. WION चा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण या व्हिडिओमध्ये अशी कोणती जागतिक स्तरावर समिती असल्याचा आणि त्याचे अध्यक्ष पंतप्रधान मोदींना केल्याचा उल्लेख नाही. व्हायरल होत असलेला व्हिडिओ 15 मार्च 2020 चा आहे. सार्क देशांच्या बैठकीची बातमी देत असताना त्यात म्हटलं आहे की, मोदींनी कोरोनाच्या लढाईसाठी घेतलेल्या पुढाकाराचं जागतिक नेत्यांनी कौतुक केलं. पंतप्रधान मोदींनीही जी 20 परिषदेच्या आधी सार्क देशांच्या बैठकीबाबत मोदींनी ट्विट केलं होतं. त्यात मोदींनी दक्षिण आशियाई देशांचं प्रतिनिधीत्व करण्याबाबत आणि कोरोनाशी लढाईबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर जी20 शिखर परिषदेत बोलताना मोदी म्हणाले होते की, कोरोनामुळे जगावर ओढावलेले संकट पाहा आर्थिक उद्दिष्टांपेक्षा जागतिक समृद्धी आणि सहाकर्याचा दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे. तसंच कोरोनाविरुद्धचा हा लढा लढण्यासाठी जागतिक समन्वयही महत्वाचा असून त्यासाठी सहकार्य मिळावं असं आवाहनही मोदींनी केलं होतं. पाहा VIDEO : सावधान! ग्लोव्ह्जमुळेही पसरू शकतो कोरोना, नर्सनं सांगितलं कारण व्हायरल मेसेजमध्ये केला जातत असलेला दावा खोटा आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनी मोदींच्या प्रयत्नांचे कौतुक केलं होतं. पण त्यांनी जागतिक स्तरावर कोणत्याही प्रकारच्या पुढाकाराबाबतचा प्रस्ताव दिलेला नाही. इंग्लंडकडून सुद्धा अशा काही हालचाली झालेल्या नाहीत. 12 मार्चला इंग्लंड आणि भारताच्या दोन्ही नेत्यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली होती. त्यात फक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली एवढंच सांगण्यातं आलं होतं. हे वाचा : 'मी कोरोना पॉझिटिव्ह, आता बघा कसा पसरवते', तरुणीने VIDEOद्वारे दिली धमकी संकलन, संपादन - सुरज यादव
    First published: