जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हे काय! केजरीवाल यांनी चक्क उलटा धरला धनुष्यबाण? फोटो Viral होताच समोर आलं सत्य

हे काय! केजरीवाल यांनी चक्क उलटा धरला धनुष्यबाण? फोटो Viral होताच समोर आलं सत्य

व्हायरल फोटो, FAKE

व्हायरल फोटो, FAKE

त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामुळे लोकांनी त्यांना खूपच ट्रोल केलं. एवढंच काय तर त्यांच्याबद्दल खूप वाईट शब्द देखील वापरले गेले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 13 ऑक्टोबर : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यथे अनेक असे लोक आहेत. ज्यांनी रातोरात प्रसिद्धी मिळवली आहे. तसेच असे काही व्हिडीओ किंवा फोटो आहेत. जे ट्रेंड होऊ लागतात. सोशल मीडियामुळे लोकांना माहिती मिळवण्यासाठी मदत मिळते. परंतू यासोबत याचे तोटे देखील आहेत. येथे बऱ्याच फेक गोष्टींना शेअर केलं जातं. ज्यामुळे कॉट्रोवर्सी निर्माण होते. बऱ्याचदा लोक येथे घटनेची सत्यता न तपासता अनेक गोष्टी शेअर करतात आणि त्याबद्दल आपलं मत देखील मांडतात. जे फारच चुकीचे आहे. हे ही वाचा : ड्यूटीच्या वेळी झोपताना पकडला गेला, दिलेलं कारण वाचून थांबणार नाही हसू असंच काही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत घडलं. त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामुळे लोकांनी त्यांना खूपच ट्रोल केलं. एवढंच काय तर त्यांच्याबद्दल खूप वाईट शब्द देखील वापरले गेले.

व्हायरल फोटो, FAKE

नक्की काय आहे हे प्रकरण? मध्यंतरी एक फोटो व्हायरल होत होत, ज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी उलटे धनुष्य बाण धरल्याचे दिसत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सीएम केजरीवाल यांनी धनुष्यबाणाने रावणाचे दहन केले आणि तेव्हाचाच त्यांचा हा फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये त्यांनी धनुष्यबाण उलटे पकडलेले दिसत आहे. परंतू हा फोटो खोटा असल्याचे समोर आले आहे. मूळ चित्रात अरविंद केजरीवाल यांनी धनुष्यबाण बरोबर धरला आहे. परंतू कोणीतरी हे मुद्दाम करुन त्यांच्या हातातील धनुष्यबाण हा उलटा केला. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो ज्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता की, त्यांनी हा धनुष्यबाण सरळ पकडला आहे.

जाहिरात

हे ही वाचा : हा VIDEO एकदा पाहाच, जिममध्ये दोन महिला अशा काही जुंपल्या की…. यामागचं कारण पाहून बसेल धक्का काय आहे व्हायरल पोस्टमध्ये? व्हायरल फोटो शेअर करत फेसबुक युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “देशाचे दुर्दैव की बाण सुटला नाही नाहीतर कल्याण झाले असते. माफ करा, तो बाण सुटला नाही. आम्ही बाणांचा तीव्र निषेध करतो.” तसेच असं देखील म्हटलं गेलं आहे की, ‘‘एक रावण दुसऱ्या रावणावर बाण सोडतोय असं इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे.’’ लोकांना ट्रोल करणाऱ्यांची कमी नाही, म्हणून तर सेलिब्रिटी देखील बऱ्याचदा ट्रोल होत राहातात. परंतू माहिती मिळाल्यानंतर ती किती खरी आहे आणि किती खोटी याची सत्यता जागरुक नागरीक म्हणून आपण तपासायला हवी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात