मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हॉटेलबाबत हे रहस्य तुम्हाला माहितीय का? बऱ्याच ठिकाणी नसते 13 नंबरची रुम, काय आहे यामागचं सत्य?

हॉटेलबाबत हे रहस्य तुम्हाला माहितीय का? बऱ्याच ठिकाणी नसते 13 नंबरची रुम, काय आहे यामागचं सत्य?

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

13 ही संख्या अशुभ का मानली जाते? याचा संबंध पाश्चात्य संस्कृतीशी आहे. पण प्रश्न असा उभा राहातो की, पाश्चात्त संस्कृतीला भारतात महत्व का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 05 सप्टेंबर : वास्तुशास्त्रात शुभ-अशुभाला खूप मानले जाते. तसे पाहाता ही एक अंधश्रद्धा आहे. परंतू असे बहुतांश लोक आहेत. जे शुभ आणि अशुभ मुहूर्त बघून गोष्टी करतात. लोकं कितीही नाही म्हटले तरी देखील ते कुठे तरी शुभ आणि अशुभ या गोष्टी मानतात. म्हणून तर तुम्ही बऱ्याचदा लोकांना बोलताना ऐकलं असेल की 'आजचा दिवस माझाच आहे.' किंवा 'आजचा दिवस खूपच वाईट होता.' याचाच अर्थ काय? तर लोक त्यांच्या दररोजच्या आयुष्याचा देखील शुभ-अशुभाशी संबंध लावतात.

पण तुम्हाला माहितीय का की फक्त दिवसच नाही, तर संख्या देखील शुभ-अशुभ असते. वास्तुशास्त्रात संख्यांना देखील फार महत्व आहे. ज्यामध्ये काही संख्याना खूपच अशुभ मानलं जातं.

त्यांपैकी एक अशुभ संख्या मानली जाते ती म्हणजे 13. म्हणूनच बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला हॉटेलमध्ये 13 क्रमांकाची खोली किंवा 13 वा मजला पाहायला मिळत नाही.

हे वाचा : रेस्टॉरंटमधील बाथरूम वापरण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, हा फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का

आता प्रश्न असा उभा राहातो की, 13 ही संख्या अशुभ का मानली जाते? तर याचा संबंध पाश्चात्य संस्कृतीशी आहे. वास्तविक, पाश्चात्य देशांमध्ये 13 हा आकडा खूप अशुभ मानला जातो. ज्याचे पालन भारतात देखील करण्याची हळूहळू सुरुवात होत आहे. ज्यामुळेच तुम्हाला बहुतांश हॉटेलमध्ये 12 रुमनंबर नंतर थेट 14 नंबर येतो. पण 13 हा नंबर गायब असतो.

परंतु हे समजून घ्या की, असे प्रत्येक हॉटेलमध्ये असं नसतं, तर काही ठरावीक हॉटेलमध्ये ही मान्यता आहे.

परदेशात 13 व्या क्रमांकाबाबत लोकांच्या मनात अनेक भीती आहेत. असे मानले जाते की, ज्या व्यक्तीने प्रभु येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला, तो त्यांच्यासोबतच्या तेराव्या खुर्चीवर बसला होता. या कारणास्तव तिथले लोक 13 नंबरला चांगला मानत नाहीत. याच कारामुळे 13 नंबरची भीती पाश्चात्य संस्कृतीत इतकी आहे की, तेथील इमारतीतही 12व्या मजल्यानंतर थेट 14वा मजला बांधला जातो.

हे वाचा : जगातील असं रहस्यमय ब्रिज, ज्यावर जाताच आत्महत्या करतात कुत्रे, वाचा संपूर्ण माहिती

पाश्चात्त संस्कृतीला भारतात महत्व का?

तसे पाहाता अनेक परदेशी लोक भारतात भेट देण्यासाठी येतात. अशा स्थितीत या लोकांचा विश्वास लक्षात घेता भारतात देखील अनेक हॉटेल्समध्ये 13 क्रमांकाची खोली नसते किंवा हे लोक अशा ग्राहकांसाठी ही 13 नंबरची खोली ठेवत नाहीत.

(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

First published:

Tags: Shocking news, Top trending, Viral news, Viral photo