मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवरदेवाची पाठ फिरताच नवरीला...; लग्नात Ex-boyfriend ने काय केलं पाहा VIDEO

नवरदेवाची पाठ फिरताच नवरीला...; लग्नात Ex-boyfriend ने काय केलं पाहा VIDEO

एक्स-गर्लफ्रेंडच्या लग्नाला आला एक्स-बॉयफ्रेंड.

एक्स-गर्लफ्रेंडच्या लग्नाला आला एक्स-बॉयफ्रेंड.

एक्स-बॉयफ्रेंडने असं काही केलं की नवरीची नजरही खाली झुकली.

मुंबई, 24 ऑगस्ट : अनेकदा काही कारणांमुळे बॉयफ्रेंड (Boyfriend), गर्लफ्रेंडला (Girlfriend) सोडून दुसऱ्या कुणासोबत तरी लग्न (Wedding Video) करावं लागतं. किती तरी जण आई-वडील सांगतात त्याच्याशी लग्न करतात. पण आपल्या त्या जोडीदाराला किमान शेवटचं एकदा तरी पाहावं म्हणून काळजावर दगड ठेवत काही जण त्याच्या लग्नात जातात. असाच एक बॉयफ्रेंड (Ex-Boyfriend) आपल्या गर्लफ्रेंडच्या लग्नात गेला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतो आहे.

एक्स-बॉयफ्रेंड सुटाबुटात लग्नात आला. तो स्टेजवर नवरा-नवरदेवाजवळसुद्धा  (Bride Groom Video) आला. त्यानंतर त्याने असं काही केलं की नवरी पाहतच राहिली आणि तिची नजर पटकन खाली गेली.

व्हिडीओत पाहू शकता एक सूटबूट घातलेला तरुण स्टेजवर येतो आणि तो नवरदेवाच्या हात हात मिळवत त्याला लग्नाच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर त्याला आलिंगन देतही शुभेच्छा देतो. आता हा हसत हसत नवरदेवाला लग्नाच्या शुभेच्छा देतो खरं पण तो त्याचा मित्र नाही तर नवरीचा एक्स-बॉयफ्रेंड आहे.

हे वाचा - ...अन् शेवटी रडत नवरदेवाने भरमंडपात नवरीच्या पायावरच डोकं टेकलं; VIDEO VIRAL

नवरीच्या एक्स-बॉयफ्रेंडने नवरदेवाला मिठी मारल्यानंतर नवरदेवाची पाठ नवरीकडे होते. तेव्हा तिचा एक्स-बॉयफ्रेंड तिच्याकडे रागाने पाहतो. गर्लफ्रेंडने आपल्याला फसवल्याच्या वेदना त्याच्या डोळ्यात दिसून येतात. त्याचे डोळे पाण्याने भरलेले दिसतात. एक्स-बॉयफ्रेंडची ती नजर पाहून नवरीसुद्धा आपली नजर झुकवते. त्यानंतर एक्स-बॉयफ्रेंड चेहऱ्यावर पुन्हा खोटं हसू दाखवत, स्टेजवरून खाली जातो.

हे वाचा - ऐन लग्नात भडकली नवरी, नवरदेवाजवळ जायलाच तयार नाही; काय झालं ते VIDEO मध्ये पाहा

जारा क्वीन इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा एक इन्स्टाग्राम व्हिडीओ असला तरी किती तरी जणांसोबत हे प्रत्यक्षात घडलं आहे. त्यामुळे असे लोक हा व्हिडीओ पाहून इमोशनल होत आहेत. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:
top videos

    Tags: Viral, Viral videos, Wedding video