मराठी बातम्या /बातम्या /Viral /...अन् शेवटी रडत नवरदेवाने भरमंडपात नवरीच्या पायावरच डोकं टेकलं; VIDEO VIRAL

...अन् शेवटी रडत नवरदेवाने भरमंडपात नवरीच्या पायावरच डोकं टेकलं; VIDEO VIRAL

नवरीला पाहताच नवरदेव झाला इमोशनल.

नवरीला पाहताच नवरदेव झाला इमोशनल.

नवरीला पाहताच नवरदेवाला कोसळलं रडू.

मुंबई, 24 ऑगस्ट : लग्नात (Wedding Video) आपण नवरीला (Bride video) रडताना (Bride crying) पाहतोच. पण नवऱ्याला (Groom Video)  रडताना कधी पाहिलं आहे का? सध्या अशाच एका नवऱ्याचा (Groom crying) व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात लग्नात नवरीऐवजी चक्क नवराच (Bride groom video) रडताना दिसला नवरा फक्त रडला नाही तर त्याने रडत रडत नवरीच्या पायावरही आपलं डोकं टेकलं आहे.

सोशल मीडियावर (Social Media) एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यात नवरीपेक्षा नवराच जास्त इमोशनल झाल्याचं दिसतं आहे. नवरीला पाहताच नवऱ्याला रडू कोसळलं आहे.

View this post on Instagram

A post shared by WedWise.co.in (@wedwise)

व्हिडीओत पाहू शकता नवरा नवरी एकमेकांसमोर बसले आहेत. त्यांच्यामधील अंतरपाट जेव्हा बाजूला केला जातो, तेव्हा नवरदेव पहिल्यांदाचा आपल्या नवरीला ब्राइडल लूकमध्ये पाहतो. तो तिला पाहून हैराणच होतो आणि एकटक तिच्याकडेच पाहत राहतो. त्याच्या डोळ्यात तिच्यावर असलेलं प्रेम स्पष्ट दिसून येतं. त्याला रडूही येत असतं पण तो ते कसंबसं आवरत आपल्या रडू येतं आहे, असं नाटक करून दाखवतो.

हे वाचा - नवरदेवाला पाहताच सुटला नवरीचा ताबा! लग्नमंडप सोडून रस्त्यावर आली...; VIDEO पाहा

आपल्या डोळ्यातील पाणी पुसल्याचं दाखवत तो आपल्या भावना व्यक्त करतो आपले डोळे पुसत तो नवरीच्या गुडघ्यावर आपलं डोकं टेकवतो.  नवरीला हे पाहून हसूच येतं. त्यावेळी तिथं उपस्थित लोकही हसू लागतात. वेडवाइझ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. नवरदेवाचा आपले इमोशन व्यक्त करण्याचा हा हटके अंदाज अनेकांना आवडला आहे.

First published:
top videos

    Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video