नवी दिल्ली 18 जुलै : आजच्या काळात अनेक प्रकारचे फॅशन ट्रेंड पाहायला मिळतात. फॅशनचे ट्रेंड सतत बदलत राहतात. कधी जुना ट्रेंड पुन्हा नव्याने येतो तर कधी लोक काहीतरी नवीन डिझाईन घेऊन येतात. जर तुम्हाला वाटत असेल की फॅशन ही फक्त शहरवासीयांना माहीत आहे, तर जरा थांबा. इथिओपियाची मुर्सी जमात शहराच्या या जीवनापासून अतिशय दूर आहे. पण त्यांची राहाण्याची पद्धत सगळ्यात वेगळी आणि अनोखी आहे. इथे लोकांचे लटकलेले ओठ त्यांना सुंदर बनवतात. एकीकडे शहरातील मुली लिपस्टिक लावून आपले ओठ सुंदर बनवतात, मात्र मुर्सी जमातीतील मुली आपले ओठ मोठे करून खाली लटकवून सुंदर बनवतात. या जमातीत जितके ओठ लटकतात तितके ते अधिक सुंदर मानले जातात. फक्त मुलीच नाही तर मुलंही इथे ओठ लटकवतात. मात्र हे करण्याची पद्धत खूप वेदनादायक आहे. असं असूनही आपल्या जमातीच्या परंपरेसाठी हे लोक हा त्रास सहन करण्यास तयार होतात. Unique Railway Junction : भारतातलं असं हे रेल्वे स्टेशन इथं ना तिकीट काउंटर, ना कुठली ट्रेन थांबते; असं का? मुर्सी जमात अतिशय भयंकर मानली जाते. त्यांची लोकसंख्या सुमारे दहा हजार आहे. या जमातीचे लोक त्यांच्या परंपरांना खूप बांधील आहेत. त्यांची उपेक्षा त्यांना सहन होत नाही. प्रथेच्या नावाखाली हे लोक गाईचं रक्तही पितात. याशिवाय, ओठ लटकण्यासाठी तोंडाच्या आत एक मोठी डिस्क ठेवली जाते. इथे लग्नासाठी मारामारीही होते. दोन पुरुष काठीने भांडतात. जो जिंकतो त्याला एक सुंदर बायको मिळते. मुर्सी जमातीचे फोटो आता सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मात्र यापूर्वी असं नव्हतं. ही जमात बाहेरच्या लोकांना प्रवेश देत नसायची आणि परवानगीशिवाय कोणी गेलं तर त्याचा जीवही घ्यायची. मात्र, आता ही जमात बाहेरच्या जगासोबतही मिसळत आहे. त्यामुळे त्यांचे फोटो आणि माहिती इतरांनाही मिळत आहे. भारतातही अशी एक जमात आहे की ते बाहेरच्या लोकांना त्यांच्या भागात येऊ देत नाहीत, विमानंही त्या जमातीच्या परिसरातून उडत नाहीत. भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.