तिनसुकिया, 17 जुलै : तुम्ही सर्वांनी रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे जंक्शन नक्कीच पाहिले असेल. रेल्वे स्टेशनवर तुम्हाला माहिती असेल की रेल्वे थांबे आणि मग तिथे प्रवाशी चढतात आणि मग ती ट्रेन पुढच्या प्रवासाला रवाना होते. प्लॅटफॉर्मवर गेल्यावर तुम्ही रेल्वेचे तिकीट खरेदी करतात. मात्र, यासोबतच याठिकाणी अनेक सुविधाही तुम्हाला मिळतात. मात्र, देशात एक असे जंक्शन आहे, जिथे कोणतीही रेल्वे थांबत नाही तसेच इथे कोणतेही तिकीट काऊंटरही नाही. विशेष म्हणजे भारतात हे एकमात्र असे जंक्शन आहे. हे रेल्वे जंक्शन आसाम राज्यातील तिनसुकिया येथे आहे. इथे कोणतीही रेल्वे थांबत नाही त्यामुळे कोणताही प्रवाशी रेल्वेत चढू शकत नाही. या रेल्वे स्टेशनला श्रीपुरिया गांव रेल्वे जंक्शन (श्रीपुरिया गांव जेएन) या नावाने ओळखले जाते. या रेल्वे जंक्शनचा कोड ‘एसपीजेएन’ हा आहे. तसेच याठिकाणी स्टेशन मास्तरसह 3 ते 5 कर्मचारी आहेत.
कसे आहे हे जंक्शन? श्रीपुरिया ग्राव रेल्वे जंक्शन पासून हिजुगुरी येथील तिनसुकिया रेल्वे स्टेशनचे अंतर फक्त 7 ते 8 किमी आहे. या जंक्शनवर दिवसा राजधानी एक्सप्रेस अनेक रेल्वे चालतात. यामुळे जरी इथे कोणताही प्लॅटफॉर्म किंवा तिकीट काऊंटर नसले तरी सतत व्यस्त असणारे श्रीपुरिया गाव रेल्वे जंक्शन हे अत्यंत महत्त्वपुर्ण जंक्शन आहे. याठिकाणी रेल्वे का थांबत नाही? श्रीपुरीया गाव रेल्वे जंक्शन डिब्रूगढ़-न्यू तिनसुकिया रेल्वे स्टेशन आणि जुने तिनसुकिया रेल्वे स्टेशन-दिगबाई-मार्गेरिटा-लिदुर रेल्वे लाइनला जोडते. या रेल्वे जंक्शनवर हा निर्णय घेतला जातो की, दिल्ली गुवाहाटीच्या दिशेने येणारी रेल्वे नवीन तिनसुकिया रेल्वे स्टेशन जाईल की जुन्या तिनसुकिया रेल्वे स्टेशनवर जाईल. कारण या श्रीपुरीया गाव रेल्वे जंक्शनवरुन नवीन तिनसुकिया रेल्वे स्टेशन फक्त 7 किमी अंतरावर आणि जुने तिनसुकिया रेल्वे स्टेशन फक्त 4.6 किमी अंतरावर आहे. कदाचित यामुळे याठिकाणी कोणत्याही रेल्वेला थांबण्याची आवश्यकता नाही.