मुंबई, 21 फेब्रुवारी : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात, हे व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ हे तुम्हाला हसायला भाग पाडतात. हे व्हिडीओ इतके मनोरंजक असतात की ते पाहण्यात आपला वेळ कसा निघून जातो, हे आपलंच आपल्याला कळत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुमच्या अंगावर नक्कीच काटा उभा राहिल. हा व्हिडीओ एका अपघाताचा व्हिडीओ आहे, ज्यामध्ये एक महिला गंभीर रित्या जखमी होते. हे ही पाहा : Video :मुलगी आईपासून लपून करत होती असं काम, मागून पाहताच पडली कानशिलात या महिलेची काहीही चुक नव्हती, ती फक्त फुटपाथवरुन आपल्या रस्त्याने जात होती, पण तितक्यात रस्त्यावरील एका कारचा टायर निघाला आणि तो थेट महिले जवळ आला. महिलेला हे लक्षात येताच ती बाजूला झाली. पण हा गाडीचा चाक मागे असलेल्या बसस्टॉपला ठोकला आणि मग पुन्हा या महिलेच्या डोक्याला लागला, ज्यामुळे ही महिला खाली पडली आणि जखमी झाली.
Yikes! https://t.co/OSQ0qRYPZd
— Wow Terrifying (@WowTerrifying) February 20, 2023
हा टायर इतक्या जोरात आला की महिला थेट तोंडावरच पडली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की या अपघातानंतर ही महिला उठलीच नाही. पुढे या महिलेसोबत काय घडलं, याची माहिती मिळाली नाही. हा व्हिडीओ परदेशातील असावा असं म्हटलं जात आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @WowTerrifying या अकाउंटवरु शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 2.3 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

)







