मुंबई, 10 मे : भारतात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे माणसांची वर्दळ कमी झाल्यानं अनेक प्राणी आणि पक्षी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी मोर आल्याचंही पाहायला मिळालं होतं. आता तर हरिणही मानवी वस्तीत शिरू लागले आहेत. पवईच्या हनुमान टेकडी परिसरात रात्रीच्या सुमारास घराच्या छतावरून हरिण खाली पडलं. अचानक आलेल्या या हरणाला पाहून लोक घाबरले. मात्र काही वेळात त्याला बघण्यासाठी आजूबाजूचे लोक जमा झाले. वन विभाग आणि प्राणी मित्रांना या संदर्भात माहिती देण्यात आली. छतावरून खाली पडल्यामुळे हरणाला दुखापत झाली होती. घाबरलेल्या अवस्थेत तेही एका जागी बसून होते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या हरणाला सुखरुप सुटका करून नेलं आहे. खाण्याच्या शोधात हरिण आलं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लॉकडाऊनमुळे मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक प्राणी-पक्षी रस्त्यावर किंवा मानवी वस्त्यांमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. हवेतील प्रदूषणही कमी झालं आहे. गाड्यांची वर्दळ पूर्ण थांबल्यानं आणि इतर गोष्टींमुळं होणारं प्रदुषण कमी झाल्यानं हवेची गुणवत्ता सुधारली आहे. यामुळे हवेत असणारे प्रदुषणाचे धुलीकण आणि ढग नाहीसे झाले आहेत. गंगेच्या पाण्याची गुणवत्ता 50 टक्के सुधारली आहे. हे वाचा- #MothersDay निमित्ताने रोहित पवारांनी शेअर केली आईसाठी भावूक पोस्ट हे वाचा- कोरोनावर चेन्नईमध्ये तयार केलं औषध, मॅनेजरनं स्वत:वरच केली चाचणी आणि… हे वाचा- सरकारकडून गरिबांना गिफ्ट! 1 जूनपासून देशातील कोणत्याही भागातून खरेदी करा रेशन संपादन- क्रांती कानेटकर