पुणे, मुंबईत कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन तर नाही ना? ICMR करणार तपासणी

पुणे, मुंबईत कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन तर नाही ना? ICMR करणार तपासणी

Coronavirus ची सर्वाधिक प्रकरणं असलेल्या 75 जिल्ह्यांमध्ये ICMR नजर ठेवणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : देशात कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. कोरोनाग्रस्तांचा वाढता ग्राफ पाहता कित्येक जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट झालेत. जवळपास 75 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त प्रकरणं आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन (Community Transmission) तर झालं नाही ना? हे तपासलं जाणार आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या 75 जिल्ह्यात अभ्यास सुरू करण्यासाठी योजना तयार करत आहे.

कोरोनाव्हायरसची प्रकरणं ज्या 75 जिल्ह्यांमध्ये वाढत आहेत, तोच रेड झोनचा भाग आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, आग्रा, अहमदाबाद, ठाणे अशा क्षेत्रांचा समावेश आहे.

हे वाचा - लस शोधण्यासाठी निरोगी लोकांना करणार कोरोना पॉझिटिव्ह? WHOची वादग्रस्त चाचणी

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1,165 नवीन कोरोनाव्हायरसची प्रकरणं आहेत. ज्यानंतर राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या  20,228 झाली आहे, तर 780 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक 12,864 रुग्ण आहेत, तर मृतांचा आकडा 489 वर पोहोचला आहे. मुंबईसह पुणे, ठाण्यातही कोरोना रुग्णांची संख्या 2 हजारांवर पोहोचली आहे.

हे वाचा - ग्रीन झोन होत आहेत रेड झोन, 9 दिवसांत 'या' 20 जिल्ह्यांत 283 नवीन प्रकरणं

प्रत्येक जिल्ह्यात सिव्हियर एक्युट रेस्पिरेटरी इलनेस (SARI) म्हणजे श्वसनसंबंधी समस्या आणि इन्फ्लुएंझासारख्या आजारांच्या जवळपास  250 लोकांची तपासणी करावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिल्यात. जेणेकरून कोरोनाव्हायरसच्या प्रसारावर नजर ठेवली जाईल आणि कोरोना संक्रमित रुग्णांवर लक्ष ठेवता येईल.

एन्झाइम लिंक्ड इम्युनोसोर्बेंटने असे टेस्ट (enzyme-linked immunosorbent assay)  केली जाणार

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जास्त कोरोना रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये रॅपिड अँटी बॉडी टेस्ट किट्समार्फत चाचणी करण्याचा आयसीएमआरचा प्लॅन होता, मात्र त्यामध्ये अडचण येत असल्यानं हा प्लॅन स्थगित करण्यात आला आहे. आता या 75 जिल्ह्यात एन्झाइम लिंक्ड इम्युनोसोर्बेंटने असेमार्फत चाचणी केली जाणार आहे.

हे वाचा - मुंबईतील आणखी एक भयानक VIDEO झाला व्हायरल, मृतदेहाच्या बाजूलाच सुरू आहेत उपचार

आयसीएमआरने कम्युनिटी ट्रान्समिशन तपासण्यासाठी मार्चमध्येही अशाच प्रकारे अभ्यास केला होता. त्यावेळी देशात कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झाल्याचा कोणताही पुरावा मिळाला नव्हता.

काय आहे कोरोनाव्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन?

कम्युनिटी ट्रान्समिशन, हा असा टप्पा ज्यामध्ये आपण जाऊ नये, यासाठी सरकार कठोर अशी पावलं उचलत आहे. या टप्प्यामध्ये कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीने परदेश प्रवास केलेला नसतो किंवा परदेशाहून आलेल्या अशा कोणत्याही व्यक्तीशी तिचा संपर्क आलेला नसतो. एकंदर त्या व्यक्तीला व्हायरसची लागण नेमकी कुठून आणि कशी झाली, याचा धागादोरा सापडत नाही व्हायरसचा स्रोत समजत नाही आणि व्हायरस सर्वत्र पसरू लागतो.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 10, 2020, 12:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading