मुंबई 10 मार्च : सिंह हा जंगलाचा राजा मानला जातो, पण वनराज हत्ती सिंहाच्या समोर आल्यावर काय होईल? या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. दोघांमध्ये टक्कर झाली तर शेवटी कोणाचा विजय झाला असता, असाही विचार तुम्ही करत असाल. मात्र हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. मांजरीला त्रास देणं सापाला भोवलं; शेवटी झाली अशी अवस्था की पाहून व्हाल शॉक..VIDEO जंगलातील तलावाच्या काठावर वनविभागाने स्वच्छ पाण्याने भरलेला हौद तयार केल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्या हौदाजवळ एक सिंहीण बसलेली असते. अचानक तिला जवळ काहीतरी मोठं आल्याचा आवाज येतो, त्यामुळे ती सावध होते. तेव्हाच एक महाकाय हत्ती पाणी पिण्यासाठी तिथे पोहोचतो. हौदावर पोहोचण्यापूर्वी हत्तीलाही काहीतरी धोका जाणवतो. यानंतर तो सावधपणे पुढे जात हौदातील पाणी पितो. तेवढ्यात त्याची नजर टाकीच्या पलीकडे बसलेल्या सिंहिणीवर पडते. त्याला धक्का बसतो. पण सिंहीणीला घाबरण्याऐवजी तो थोडा मागे सरकतो आणि सोंड वर-खाली करत सिंहिणीच्या पुढील कृतीचा आढावा घेतो.
जेव्हा सिंहीण प्रतिक्रिया देत नाही तेव्हा तो आपली सोंड पुढे सरकवून हौदातून २-३ वेळा पाणी पितो. यासोबतच आपली ताकद दाखवण्यासाठी तो हौदातील पाणी सोंडेत भरून सिंहावर फेकतो. त्याचवेळी जोरजोरात ओरडत तो सिंहिणीच्या मागे धावतो. हत्तीला आपल्या मागे येताना पाहून सिंहीण तिथून निघून जाते. पण हत्तीचा राग शांत होत नाही. तो तिचा किंचाळत पाठलाग करतो, त्यानंतर सिंहीण पळून जाते.
हा व्हिडिओ युट्यूब चॅनल लेटेस्ट साइटिंग्जवर ४ मार्च रोजी पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हत्तीने सिंहावर पाणी शिंपडले. या व्हिडिओवर लोक विविध मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, हत्तीने सिंहीणीसोबत होळी खेळली. इतर वापरकर्ते म्हणाले, जंगलाचा राजा अर्थातच सिंह आहे पण जोपर्यंत तो गटात आहे तोपर्यंतच. एक यूजर म्हणतो, जंगलाचा खरा राजा सिंह नसून वनराज आहे आणि त्याने ते दाखवून दिलं आहे.