जाहिरात
मराठी बातम्या / Viral / फूटबॉलसारखा हत्तीनं उडवला गाडीचा टायर, पुढे काय झालं पाहा VIDEO

फूटबॉलसारखा हत्तीनं उडवला गाडीचा टायर, पुढे काय झालं पाहा VIDEO

फूटबॉलसारखा हत्तीनं उडवला गाडीचा टायर, पुढे काय झालं पाहा VIDEO

या व्हिडीओला 16 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 जून : हत्तीच्या लहान पिल्लाचे अनेक खोडकर व्हिडीओ गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याआधी हत्तीचा घसरगुंडी करताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता हत्तीनं तर गाडीच्या टायरचा फुटबॉल केला आहे. या व्हिडिओमध्ये हत्ती फुटबॉलसारखं टायरसोबत खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्वीट केला आहे. या व्हिडीओला 16 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला 385 रिट्वीट तर 2 हजारहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. हा हत्ती या खेळात माहिर असल्याचं सुशांत नंदा यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

जाहिरात

हे वाचा- शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला सरड्यानं दिला ‘जोर का झटका’, काय केलं पाहा VIDEO

जाहिरात

हे वाचा- जीपमधून लाकडं काढण्यासाठी असा केला जुगाड, VIDEO पाहू आनंद महिंद्राही झाले हैराण या व्हिडीओवर सोशल मीडियावर युझर्सनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये एका युझरने हत्ती फुटबॉल खेळताना कसा किक मारतो हे दाखवलं आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता गाडीचा चाकाचा टायर हत्ती आपल्या सोंड आणि पायांच्या मदतीनं फिरवत आहे. या टायरला फूटबॉल समजून खेळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात