जीपमधून लाकडं काढण्यासाठी असा केला जुगाड, VIDEO पाहू आनंद महिंद्राही झाले हैराण

जीपमधून लाकडं काढण्यासाठी असा केला जुगाड, VIDEO पाहू आनंद महिंद्राही झाले हैराण

आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 60 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 जून : महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ऑटो मोबाईल कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्र यांना सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सधा सुधा नाही तर इंडियन आणि भन्नाट जुगाड केला आहे. हा जुगाड पाहून आनंद महिद्राही हैराण झाले आहेत. बुधवारी त्यांनी आपल्या अकाऊंटवर एका जीपचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता तोडलेल्या लाकडांनी भरलेली एक जीप येते आणि ती लाकडं एका ठिकाणी ओतून ठेवते. एक एक लाकूड काढायला लागू नये आणि लॉरी किंवा ट्रकसारखं जीपचा मागचा भाग वर उचलून ही लाकडं खाली उतरवू शकत नाही म्हणून या लोकांनी जीप उचलली आणि तिरकी केली. जीप चालकासकटच ही जीप उचलल्याचं पाहायला मिळालं. या कर्मचाऱ्यांनी केलेला इंडियन जुगाड पाहून खूप आश्चर्य वाटलं असं असं आनंद महिंद्र यांनी ट्वीट करताना कॅप्शन दिलं आहे.

हे वाचा-हायवेवर गाडी चावलत असतानाच दिसला साप, महिलेनं चालत्या गाडीतून मारली उडी आणि....

हे वाचा-उंदीर-मांजराची जमली गट्टी; रिअल लाइफमधील TOM & JERRY चा व्हिडीओ व्हायरल

आज हा मला व्हिडीओ दिसला सुरक्षा आणि लोडिंगच्या नियमांचं उल्लंघन करणारा हा व्हिडीओ आहे. हे ट्रक मालकांसाठी अत्यंत असुरक्षित आहे. तरीही आपले लोक कोणत्याही स्त्रोताशिवाय व्यवस्थापन कसं करतात याबद्दल मला आश्चर्य वाटतं असं आनंद महिद्रा आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात. अनेक युझर्सनी या व्हिडीओवर कमेट्सही केल्या आहेत. आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्वीटला 500 हून अधिक लोकांनी रिट्वीट केलं तर 60 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 26, 2020, 10:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading