सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांसंबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल (Shocking viral video) होत असतात. यातील काही व्हिडीओ पाहून धडकी भरते. तर काही व्हिडीओ हे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. तर काही व्हिडीओ तुम्हाला भावनिक करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कशा प्रकारे एक किंग कोब्रा लहानग्याला पाहून त्याचा पाठलाग करतो. कोब्रा अतिवेगाने सरपटत त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो.
सांगितलं जात आहे की, हा व्हिडीओ व्हिएतनाम येथील आहे. एक लहानगा घराबाहेर अंगणात खेळत होता. तेव्हा त्याचे आजोबाही तेथे उभे होते. अशावेळी अचानक बाळाच्या आजोबांना एक भयानक किंग कोब्रा दिसला. त्याला पाहून आजोबा ओरडू लागले. तेव्हा घरात असलेले बाळाचे वडील धावत आले व बाळाला कडेवर घेऊन घराच्या दिशेने पळाले. दुसरीकडे आजोबांचं सापाकडे लक्ष होते. साप त्यांच्यादिशेने अत्यंत वेगाने येत होता. ते पहिल्यांदा हातात एक काठी घेतात आणि घराचा दरवाजा बंद करून घेतात. मात्र साप आत जाण्यासाठी खूप प्रयत्न करीत असल्याचं दिसतं. (The frightening King Cobra behind the little one playing outside the house See what happened in the VIDEO)
हे ही वाचा-बापरे! किचनमध्ये घर करून बसले होते 17 विषारी साप; महिलेनं चूल पेटवली अन्...
भयावह व्हिडीओ...
बराच वेळ साप आता शिरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र दार बंद असल्याने तो आता जाऊ शकला नाही. शेवटी बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर साप तेथून निघून जातो. हा व्हिडीओ कोणीतरी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. वेळेत बाळाला घरात नेल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. तर अनेकांनी सापाची गती पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Python snake, Shocking viral video, Snake