मुंबई, 16 जुलै : माकडाच्या (Monkey) हाती कोलीत लागल्यावर काय होतं हे आपल्या बोधकथेतून माहितीच आहे. सध्या अशाच एका माकडाचा व्हिडीओ (Monkey video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात त्याच्या हातात कोलीत नाही पण चाकू (Knife in monkey's hand) लागला आहे. हातात चाकू येताच माकडाला आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या मदाऱ्यावरच त्याचा खेळ उलटला आहे (Monkey knife attacking on madari). माकड आणि मदाऱ्याचा शॉकिंग व्हिडीओ पाहून सुरुवातीला तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.
माकडं हैराण करतात, त्रास देतात हे आपल्याला माहितीच आहे. अगदी माणसांप्रमाणे हुबेहूब वागण्याचा ते प्रयत्न करतात. त्यात तर ते बिलकुल कसर सोडत नाही. असंच किती तरी महिने म्हणा किंवा वर्षे मदाऱ्यासोबत राहून त्याच्या इशाऱ्यावर नाचून माकडं बरंच काही शिकलेली असतात. त्यामुळे संधी मिळाली तर मग माकडाचा मदारी आणि मदाऱ्याचं माकड कधी होईल सांगू शकत नाही. असाच हा व्हिडीओ आहे.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता, तीन-चार माकडं आहेत. त्यापैकी एक माकड मोठ्या हुशारीने मदाऱ्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतो (Monkey snatching knife from madari). त्यानंतर तो त्या चाकूने मदाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मध्ये मध्ये पाहू शकता माकड चाकू जमिनीवर घासतो. म्हणजे तो त्या चाकूला धार काढतो आहे. त्यानंतर पुन्हा तो चाकू मदाऱ्याच्या दिशेने करतो. कदाचित त्याने आपल्या मदाऱ्याला चाकूला असं धार काढताना पाहिलं असावं. माकडाने मदाऱ्याच्या हातातील चाकू हिसकावून घेत मदाऱ्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
हे वाचा - Suction Cup Fish : या माशाची KISS आहे खूप लकी; किस करताच चमकेल तुमचं नशीब
किती तरी वेळ माकड मदाऱ्याला आपल्या इशाऱ्यावर नाचवतं. पण अशा आऊट ऑफ कंट्रोल झालेल्या माकडाला कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं याची ट्रिक मदाऱ्यांकडे असतेच. या मदाऱ्यानेही त्या ट्रिकचा वापर केला. त्याने सुरुवातीला माकडाच्या हातातून चाकू मागून काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण माकड काही ऐकेना. शेवटी मदारी आपल्या बाजूला असलेल्या झोळीतून एक छोटीशी बंदूक काढतो. आपल्या हातात एक ती बंदूक धरून तो माकडाला दाखवतो. बंदूक पाहताच माकड घाबरतं आणि गुपचूप ते शहाण्यासारखं आपल्या हातातील चाकू मदाऱ्याच्या हातात देतं. यानंतर मदारी पुन्हा माकडाच्या हातात चाकू देतं. तेव्हा मात्र माकड शांत असतं.
हे वाचा - घराच्या बाहेर खेळणाऱ्या लहानग्याच्या मागे भयावह किंग कोब्रा; VIDEO मध्ये पाहा
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Other animal, Pet animal, Shocking viral video, Viral, Viral videos, Wild animal