मुंबई, 20 जुलै: वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता या प्राण्यांप्रमाणे हत्तीसुद्धा (Elephant) जंगलात राहतो. पण बहुतेक वेळा इतर प्राण्यांसारखी हत्तीची (Elephant video) फार भीती वाटत नाही. हत्तीची (Elephant in jungle) माणसांसोबत पटकन मैत्री होते. त्यामुळे काही जण बिनधास्तपणे हत्तीच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. पण हत्ती जर पिसाळला (Angry Elephant) तर मात्र खैर नसते. तो काय करेल याचा नेम नाही. सध्या अशाच एका हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. काही लोक हत्तीचा व्हिडीओ काढत होते. हे पाहून हत्ती चवताळला. तो थेट रस्त्यावर आला आणि व्हिडीओ काढणाऱ्यांच्या मागे धावत सुटला. पुढे काय घडलं हे तुम्हीच व्हिडीओत पाहा.
Roads in Elephant landscape prove to be a great hindrance in their movement & often act as a barrier, add to this the disturbance due to traffic & insensitive public which ultimately increases the stress level of the animal & often leads to incidents of human - wildlife conflict! pic.twitter.com/MMMSXeubFg
— Vaibhav Singh,IFS (@VaibhavSinghIFS) July 17, 2021
व्हिडीओत पाहू शकता. एक हत्ती एका उंचावरून रस्त्यावर उतरताना दिसतो आहे. त्याला दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे असं सुरुवातीला वाटेल. पण तो हत्ती दुसरीकडे जाण्यासाठी नाही तर रागाने रस्त्यावर उतरत आहे. काही लोकांनी त्याच्याकडे कॅमेरा धरला आणि त्याला आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करत होते. हत्तीचं लक्ष या कॅमेऱ्याकडे गेलं आणि तो संतप्त झाला. त्याला राग अनावर झाला आणि तो थेट त्यांच्यामागे धावत सुटला. हे वाचा - बापरे! Hello Brother म्हणत चक्क वाघाशी मैत्री करायला गेला आणि…; पाहा VIDEO हत्ती रस्त्यावर येताच त्याचा व्हिडीओत काढणारे लोक ओरडू लागतात आणि तिथून थेट पळ काढतात. सुदैवाने ते गाडीत आहेत, म्हणून हत्तीपासून दूर वेगाने जातात. तरीसुद्धा काही अंतर हत्ती त्यांच्या पाठलाग करतो. त्यांचा पिच्छा काही सोडत नाही. पण मग हे लोकसुद्धा आपल्या गाडीचा वेग वाढवतात आणि हत्तीपासून दूर जातात. आता हे लोक काय आपल्या तावडीत सापडत नाहीत, हे हत्तीलासुद्धा कळतं म्हणून तो तिथंच थांबतो. हत्ती इतका संतप्त झाला आहे की जर हे लोक रस्त्यावर असेच उभे असते तर त्यांचं काय झालं असतं, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. हे वाचा - OMG! 4 सीटर कारमधून निघाले इतके प्रवासी, मोजता मोजता पोलिसांची दमछाक; पाहा VIDEO आयएफएस अधिकारी वैभव सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. हत्तीच्या परिसरात जे रस्ते आहेत, ते एका पद्धतीने त्यांच्यासाठी अडथळा निर्माण करतात. ट्रॅफिक आणि असंवेदनशील लोकांमुळे त्यांचा तणाव वाढतो. ज्यामुळे ते माणसांशी भिडतात.