शेवटी दिसते किंमत ही मिठाई तयार झाल्यानंतर व्हिडिओत या मिठाईची किंमत दिसते. मिठाईची किंमत आहे 16 हजार रुपये किलो. आता ही किंमत ऐकून अऩेकांची तोंडं कडू झाल्याचे अनुभव सांगितले जात आहेत. तर अनेकांनी मिठाई खाण्याची इच्छाच किंमत ऐकून संपल्याचं म्हटलं आहे. मिठाई खाण्याची आवड असली, तरी या मिठाईची एवढी किंमत नेमकी कशामुळे, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. तर मिठाई खाण्यापेक्षा गूळ खाऊनच आपली इच्छा पूर्ण करावी, असं या मिठाईची किंमत ऐकल्यावर वाटत असल्याची प्रतिक्रिया एकानं दिली आहे. एकाने तर अख्ख्या महिन्याचा पगारच या मिठाईवर खर्च करावा लागेल, असं म्हटलं आहे. हे वाचा - काळीज पिळवटून टाकणारं कारण व्हिडिओ होतोय व्हायरल सध्या या मिठाईचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून साडेआठ लाखांपेक्षा अधिक जणांनी तो पाहिला आहे. अद्यापही चाहते हा व्हिडिओ पाहत असून त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स देत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Price, Record, Tasty food, Viral video.