लंडन, 08 जानेवारी : कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलो की तिथली एक खास डिश असते. शक्यतो या डिशची किंमतही जास्त असते. पण बहुतेकांना किमान एकदा तरी ही खास, महागडी डिश ट्राय करायची असते. एरवी डिशची किंमत पाहून आपले डोळे चक्रावतात पण एका रेस्टॉरंटमध्ये मात्र उलटच घडलं. इथं किमतीऐवजी पदार्थ पाहूनच घाम फुटला.
लंडनमधील एका रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचा मेन्यू पाहूनच सर्वांना धक्का बसला. वेस्टर्न लाँड्री नावाचं हे रेस्टॉरंट. हे एक सीफूड रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटने आपल्या रेस्टॉरंटमधील एका मेन्यूचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो पाहताच सर्वजण हैराण झाले आहेत. या रेस्टॉरंटच्या डिनर मेन्यूच्या पहिल्याच पानावरही हा फोटो लावण्यात आला आहे. त्यानंतर इतर पानांवर बाकीचे मेन्यू देण्यात आले आहेत. जेणेकरून जास्तीत जास्त लोक ही डिश खरेदी करतील.
हे वाचा - अंगमेहनत नाही, वॉशिंग मशीनचीही गरज नाही; कपडे धुण्याचा देशी जुगाड व्हिडीओ पाहाच
आता असं हा मेन्यू काय आहे, ज्याला पाहताच घाम फुटला. तर या मेन्यूत चक्क बदकाचं डोकं आणि मान
(Duck head and neck food menu) असा फोटो होता. साहजिकच तुमच्या खाण्यात असं काही आलं तर नक्कीच तुम्हालाही भीती वाटेल.
विशेष म्हणजे ही डिश रेस्टॉरंटमधील सर्वात महागडी डीश आहे. याची किंमत 18 पाऊंड म्हणजे जवळपास 1800 रुपये आहे.
हे वाचा - बापरे! हा नवा व्हायरस की आणखी काही? पाहा या छिद्र असलेल्या हातामागील नेमकं सत्य
या पदार्थाची किंमत सोडा फक्त पदार्थ पाहूनच लोक घाबरले. रेस्टॉरंटने सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. अनेकांनी हा पदार्थ नापसंत तेला आहे. .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.