दिल्ली, 29 सप्टेंबर : एरवी तुम्हाला खाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. पण विचार करा तुम्हाला खाण्यासाठी कुणी पैसे देत असेल तर (Food eating challenge). तुम्ही खाण्याचे शौकिन (Food lover) असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम सुवर्णसंधी आहे. तुम्ही फक्त 20 मिनिटांत 20 हजार रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला फोटोत दिसल असलेला हा भलामोठा रोल 20 मिनिटांत फस्त करायचा आहे (World’s Biggest Kathi Roll).
हा काठी रोल आहे (Eat Biggest Kathi Roll and earn money). जो जगातील सर्वात मोठा काठी रोल असल्याचं सांगितलं जातं आहे. तब्बल 10 किलोचा हा काठी रोल आहे. याची लांबी तीन वर्षांच्या मुलाच्या उंचीइतकी आहे. फक्त फोटो पाहूनच तुम्ही शॉक झाला असाल. विचार करा, ज्यांनी हा रोल प्रत्यक्षात पाहिला आहे आणि खाण्याचा प्रयत्नही केला आहे, त्यांची तर या रोलवरून नजरच हटली नसेल.
View this post on Instagram
the.food_cult इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. ज्यामध्ये हा रोल कसा बनवला जातो ते दाखवण्यात आलं आहे.
हे वाचा - VIDEO - महिला जवानांच्या जुगाडाला तोडच नाही! चक्क बंदुकीच्या टोकावर शिजवलं जेवण
गव्हाच्या पीठापासून हा रोल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये 30 अंडी फोडून टाकली आहेत. त्याशिवाय यात वेगवेगळ्या भाज्या, पनीर आणि सोया चाप आहे. सॉस, मेयोनीज टाकण्यात आहे. त्यानंतर या रोलचं वजन 10 किलो होतं. महत्त्वाचं म्हणजे हा रोल खाण्यासाठी तुम्हाला पैसे मिळणार आहेत. यासाठी फक्त 20 मिनिटांत हा रोल तुम्हाला खाऊन दाखवायचा आहे.
आता तुम्हाला खाणं प्लस कमावणं अशी ही सुवर्णसंधी सोडायची नसेल आणि हा रोल खायची इच्छा असेल तर हा रोल कुठे मिळेल, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. दिल्लीत तुम्हाला हा रोल खायला मिळेल. मॉडल टाऊन-3 मध्ये रस्त्यावरील एका फूड स्टॉलवर हा रोल मिळतो. पटना रोल सेंटर असं या स्टॉलचं नाव आहे. या रोलची किंमत 3000 रुपये ते 4000 रुपये आहे.
हे वाचा - Food Habits: कांद्याबरोबर लिंबू खावं की खाऊ नये? फायदेशीर की हानिकारक?
अनेकांनी हा रोल खाण्याचा प्रयत्न केला. पण 20 मिनिटांत हा रोल खाणं कुणालाच शक्य झालं नाही आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही हा इतका मोठा रोल इतक्या कमी वेळेत संपवू शकता. आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Viral, Viral news, Viral videos