जाहिरात
मराठी बातम्या / Viral / महिला जवानांच्या जुगाडाला तोडच नाही! चक्क बंदुकीच्या टोकावर शिजवलं जेवण; पाहा VIDEO

महिला जवानांच्या जुगाडाला तोडच नाही! चक्क बंदुकीच्या टोकावर शिजवलं जेवण; पाहा VIDEO

महिला जवानांच्या जुगाडाला तोडच नाही! चक्क बंदुकीच्या टोकावर शिजवलं जेवण; पाहा VIDEO

महिला जवानांनी स्वयंपाक करताना केलेल्या जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 सप्टेंबर : आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलाही दिसून येतात. महिला कोणत्याही क्षेत्रात असल्या बहुतेक महिला या कामाप्रमाणेच किचनमधील जबाबदारीही उत्तम पार पडतात. याला लष्करातील महिलाही अपवाद ठरल्या नाहीत. कामाप्रमाणेच स्वयंपाकाचीही जबाबदारी पार पाडताना, वेळेची सांगड घालताना किंवा घाईघाईत स्वयंपाकात काही चुका झाल्या तर त्या सुधारण्यासाठी महिलांना काही कुकिंग जुगाड (Cooking jugaad) करावेच लागतात. असाच जुगाड (Desi Jugaad) अगदी लष्करातील महिला जवानांनी केला आहे. महिला जवानांचा स्वयंपाक (Military womans cooking desi jugaad) करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. जेवण करताना या महिला जवानांनी असा जुगाड केला आहे (Military womans desi jugaad with cooker). जो पाहून तुम्ही या महिला जवानांना सॅल्युटच कराल. त्यांनी चक्क बंदुकीच्या टोकावर जेवण शिजवलं आहे.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता, दोन महिला जवान दिसत आहेत. त्यांनी चूल पेटवली आहे आणि चुलीवर कुकर ठेवला आहे. खूप वेळ झाला तरी कुकरची शिट्टी काही होईना. मग या महिला जवानांनी एक ट्रिक आजमावली. हे वाचा -  इंजिनिअरिंगची कमाल! डोंगराखाली बोगद्यात सहा पदरी महामार्ग; वरून वाहतोय कालवा एकिने आपल्या हातात बंदूक धरली आणि तिचं टोक कुकरच्या शिटीवर ठेवलं. म्हणजे बंदुकीच्या पोकळीत शिट्टी घुसवली. त्यानंर दुसऱ्या महिलेने त्याभोवती कापड गुंडाळून धरून ठेवलं. त्यानंतर लगेच कुकरची शिट्टी झाली. कुकरमधून वाफ निघताना तुम्ही पाहू शकता. त्यावेळी ही वाफ आपल्या तोंडावर बसू नये म्हणून दोन्ही महिला जवानांनी कापडाने आपलं तोंडही झाकून घेतलं. हे वाचा -  अरारारा… खतरनाक! बैलाची भारी करामत; Stunt Video पाहून नेटिझन्स हैराण चक्क बंदुकीच्या टोकावर या महिला जवानांनी जेवण शिजवलं आहे, असं म्हणण्यास हरकत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात