मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Food Habits: कांद्याबरोबर लिंबू खावं की खाऊ नये? फायदेशीर की हानिकारक?

Food Habits: कांद्याबरोबर लिंबू खावं की खाऊ नये? फायदेशीर की हानिकारक?

फोटो सौजन्य - शेफ कुणाल कपूर वेबसाइट

फोटो सौजन्य - शेफ कुणाल कपूर वेबसाइट

अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र खाता कामा नयेत. हे पदार्थ एकत्र खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. कच्च्या कांद्याच्या फोडींवर लिंबू पिळून खायला आवडत असेल तर हे वाचा. फायदेशीर आहे की हानिकारक?

    नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: कशाबरोबर काय खावं आणि काय खाऊ नये (healthy food habits) याबद्दल नेहमीच चर्चा होते. एक पदार्थ दुसऱ्या पदार्थाबरोबर खाताना त्या पदार्थांचे (food benefits) गुणधर्म एकमेकांना पूरक ठरणार असतील तर ते बरोबरच खावेत असं म्हटलं जातं. अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र खाता कामा नयेत. हे पदार्थ एकत्र खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं; मात्र काही पदार्थ एकत्र खाणंही फायदेशीर असतं.

    आहारातून मिळणारी पोषकद्रव्यं (Nutrients from Onions) शरीराची होणारी झीज भरून काढण्याचं काम करतात. म्हणूनच चांगला, पोषक द्रव्ययुक्त आहार रोज घेणं महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा अनेक जण जेवणाबरोबर सॅलडच्या स्वरूपात कांद्यावर (Onion) लिंबाचा रस (lemon juice) घालून खातात; पण तज्ज्ञांच्या मते, ते जेवताना नव्हे, तर जेवण्याआधी खाल्ल्याने जास्त फायदा होतो. कांद्यामध्ये असलेले प्रीबायोटिक इन्युलिन आणि Fructooligosaccharides आतड्यातले उपयुक्त बॅक्टेरिया वाढवून रोगप्रतिकारशक्ती सुधारतात, असं अभ्यासातून आढळून आलं आहे. याबाबतचं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने दिलं आहे.

    टोमॅटो (tomato) कांद्याबरोबर खाल्ला तर ते फायदेशीर ठरतं. टोमॅटोमध्ये लायकोपिन संयुग असतं. कांद्याबरोबर टोमॅटो खाल्ल्यावर शरीरात लायकोपिन चांगल्या प्रकारे शोषलं जातं.

    हेल्दी म्हणून दिवसभर प्यायची एनर्जी ड्रिंक, तरुणीची झाली भयंकर अवस्था

    कांदा हे एक सुपरफूड आहे. कांद्याचा आहारात समावेश केल्याने अनेक प्रकारे फायदा होतो. भारतीय जेवणातल्या जवळपास सर्व भाज्यांमध्ये कांद्याचा समावेश असतो. कांदा अॅलिसिनसारख्या सेंद्रिय सल्फर संयुगांनी समृद्ध आहे.

    कांदा हे फायबर्सचं पॉवरहाउस आहे. आहारात कांद्याचा समावेश केल्याने हृदयरोगापासून रक्षण होतं. वजन कमी करणाऱ्या खाद्यपदार्थांसह कांदा खाल्ला तर कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. कांदा वजन कमी करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरतो. लिंबासह कांदा खाणं आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं.

    मूड खराब झाला आहे तर खा ही फळं; त्यानंतर वाटेल ताजेतवाने

    तज्ज्ञांच्या मते, जेवण्यापूर्वी कच्चा कांदा लिंबाचा रस घालून खाल्ल्याने अनेक फायदे होतात. त्याला सर्वोत्तम स्टार्टर मानू शकता. यामुळे पचनक्रिया सुधारते. त्यात अनेक पोषक घटक असतात. तुम्ही कांदा सॅलड, चटणी, भाजी ग्रेव्ही अशा कोणत्याही स्वरूपात खाऊ शकता. याचा तुम्हाला फायदा होईल.

    मात्र, कांदा आणि लिंबू यांचं मिश्रण काही लोकांना मानवत नाही. अॅसिडिटी किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोमची समस्या असेल तर कांदा खाल्ल्याने गॅस होऊ शकतो. अशा वेळी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

    First published:
    top videos

      Tags: Food, Onion