मराठी बातम्या /बातम्या /Viral /अशा पद्धतीने कान साफ ​​करणे धोकादायक, यामुळे तुम्ही होऊ शकता बहिरे

अशा पद्धतीने कान साफ ​​करणे धोकादायक, यामुळे तुम्ही होऊ शकता बहिरे

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

काही लोक कान साफ करताना अशा काही चुका करतात, ज्यामुळे ते स्वत:च नुकसान करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 06 फेब्रुवारी : तुम्हाला हे माहितच असेल की आपल्याला कानात अनेकदा घाण साचते ज्यामुळे ऐकण्यात समस्या येऊ लागतात. तसेच बऱ्याचदा कान चावू लागतो किंवा कानात शिवशिवनं असं आपण त्याला म्हणतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण कान स्वच्छ करतो, परंतु काही गोष्टींची काळजी न घेतल्यास आपल्या शरीराच्या या विशेष भागाला खूप नुकसान होऊ शकते.

कानात मेण तयार होणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे, ती खरं तर आपल्या कानाच्या पडद्याच्या संरक्षणासाठी आहे, परंतु जर ते जास्त प्रमाणात जमा झाले, तर आपल्याला ऐकण्यात समस्या येते.

हे ही पाहा : Video : हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात; कित्येक मीटर उंच उडाली व्यक्ती आणि...

पण असं असलं तरी काही लोक कान साफ करताना अशा काही चुका करतात, ज्यामुळे ते स्वत:च नुकसान करतात. चला जाणून घेऊया कान साफ ​​करताना लोक कोणत्या चुका करतात. तसेच काय काळजी घेतली पाहिजे.

कान साफ ​​करताना अशी चूक करू नका

1. कापसाचे बर्ड्स (Cotton Swab) वापरणे धोकादायक आहे

बरेच लोक बिनदिक्कतपणे कापसाचे बर्ड्स वापरतात आणि आपले कान साफ करतात. परंतु कान स्वच्छ करण्याचा हा योग्य मार्ग नाही. त्यामुळे कानातले मेण आणखी आतमध्ये ढकलले जाते, त्यामुळे कानाचे पडदे फुटण्याचा धोका असतो.

2. या गोष्टी कानात घालू नका

अनेक लोक कान स्वच्छ करण्यासाठी टूथपिक्स, सेफ्टी पिन, चाव्या, हेअर क्लिप यासारख्या गोष्टी वापरतात, त्यामुळे कानाला दुखापत किंवा रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. यामध्ये कानाचा पडदा खराब होतो आणि तुम्ही बहिरेही होऊ शकता.

3. कानात मेणबत्ती किंवा मेण घालणे टाळा

अनेक लोक असं मानतात की जळत्या मेणबत्तीचा वॅक्स टाकून कान साफ करणे हा चांगला मार्ग आहे. सोशल मीडियावर यासंबंधीत अनेक व्हिडीओ देखील व्हायरल केले जातात. मात्र हा प्रकार खूपच धोकादायक आहे. यामुळे

चेहरा, केस, बाह्य कान आणि आतील कान जळू किंवा भाजू शकते.

कान साफ करण्यासाठी काय करावे?

हे उत्तम आहे की तुम्ही स्वतः कान साफ करू नका, परंतु ऑटोलरींगोलॉजिस्टची मदत घ्या. जर ते स्वतः साफ करण्याची सक्ती असेल तर कानात ग्लिसरीन, मिनरल किंवा मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाकून कानातली घाण साफ करतात.

First published:

Tags: Ear, Health, Health Tips, Lifestyle, Viral