व्हिडीओत पाहू शकता घोड्यांची रेस लागलेली आहे. घोड पळण्यासाठी तयार आहेत. गोळी फायर होताचा त्याचा आवाज ऐकून सर्व घोडे पळू लागतात. पण दोन घोडे मात्र आपसात लढताना दिसतात. एक घोडा दुसऱ्या घोड्याला चीतपट करण्याचा प्रयत्न करतो तर तो घोडा त्या घोड्याचा डाव यशस्वी न होण्याचा प्रयत्न करतो. बराच वेळ फायटिंग केल्यानंतर एक घोडा गप्पपणे तिथून निघू लागतो. घोड्याशी लढणं सोडून तो आपला पळण्याचा मार्ग स्वीकारतो. हे वाचा - बापरे! 2 महाकाय अजगरांसोबत झोपला तरुण आणि...; खतरनाक VIDEO VIRAL nature27_12 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. घोड्यांच्या रेसिंगनंतर घोड्यांच्या फायटिंगचा व्हिडीओ नेटिझन्सचा आवडला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. एका युझरने घोड्यांची अशी लढाई आपण पहिल्यांदा पाहिल्याचं सांगितलं. तर एका युझरने घोड्याना आपण सर्वात शांत समजत होतो पण आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपला विचार आपल्याला बदलावा लागेल, असं म्हटलं आहे. घोड्याची कुत्र्यासोबत मैत्री इथं दोन घोड्यांची फायटिंग तुम्ही पाहिली असेल तर काही दिवसांपूर्वी घोड्याच्या मैत्रीचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात घोड्याची मैत्री चक्क एका छोट्याशा कुत्र्यासोबत जमलेली दिसली. क छोटासा कुत्रा एका घोड्याला कंट्रोल करताना दिसतो. हा व्हिडिओ पाहण्यासारखा आहे.View this post on Instagram
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की कुत्रा घोड्याचा लगाम आपल्या दातांने पकडून पुढे चालत आहे आणि विशेष बाब म्हणजे घोडाही या कुत्र्याच्या मागे मागे चालत आहे. ViralHog ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. हे वाचा - अपनी गल्ली में कुत्ताही शेर! कुत्र्याला घाबरून सिंहानेही ठोकली धूम; पाहा VIDEO कुत्रा आणि घोड्याची ही मैत्री लोकांचं मन जिंकत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरनं म्हटलं, की कदाचित आपल्या याच गुणांमुळे हा प्राणी माणसांचा आवडता आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की कुत्रा आणि घोड्याची ही मैत्री खरंच पाहण्यासारखी आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत."Don't worry friend, I will guide you!" #viralhog #corgi #puppy #horse #feelgood pic.twitter.com/DIxTiRcls5
— ViralHog (@ViralHog) September 4, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pet animal, Viral, Viral videos