मराठी बातम्या /बातम्या /Viral /शरीर संबंधासाठी नववधूचा नकार, कारण समोर येताच सरकली नवरदेवाच्या पाया खालची जमीन

शरीर संबंधासाठी नववधूचा नकार, कारण समोर येताच सरकली नवरदेवाच्या पाया खालची जमीन

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

काही भेटीनंतर दोघेही प्रेमात पडले आणि नंतर प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. हे दोघेही लग्नासाठी उत्सुक होते. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांनी लगेच होकार दिला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 08 फेब्रुवारी : लग्न हा प्रत्येक नवरा-बायकोसाठी एक महत्वाचा दिवस असतो. यानंतर दोघांच्या ही आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते. परंतु लग्नाचे स्वप्न पाहिलेल्या एका तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडला, ज्याचा त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नसावा.

खरंतर हनिमुनच्या रात्रीच नवरदेवाला आपल्या नववधूचं असं सत्य समलं, ज्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हे मुंबईतील प्रकरण आहे. एका तरुणाने प्रेम प्रकरणानंतर आपल्या प्रेयसीशी लग्न केलं. पण तिचं सत्य काही भलतंच निघालं. कारण त्याने ज्या व्यक्तीशी लग्न केलं ती महिला नसून पुरुष आहे.

हे ही पाहा : 'या' कारणांमुळे वाढतायत विवाहबाह्य संबंधाची क्रेझ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची भेट मुंबईतील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये झाली होती. काही भेटीनंतर दोघेही प्रेमात पडले आणि नंतर प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. हे दोघेही लग्नासाठी उत्सुक होते. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांनी लगेच होकार दिला.

वराच्या म्हणण्यानुसार, त्यांचे लग्न देखील झाले. इथपर्यंत सगळं चांगलं सुरु होतं. पण हनिमून दरम्यान बायकोने पोटदुखी आणि हर्नियाच्या बहाण्याने संबंध ठेवण्यापासून रोखले. लग्नानंतर ही तरुणी या ना त्या कारणाने नवऱ्याला जवळ येण्यापासून रोखले.

त्यानंतर या तरुणाला काही वेगळाच संशय लागला. त्यानंतर तो आपल्या बायकोला घेऊन फिरायला गेला. तेथे त्याच्या लक्षात आले की त्याने ज्या व्यक्तीशी लग्न केलं आहे ती महिला नसुन मुलगा आहे. कारण तिचं शरीर आणि लिंग मुलांप्रमाणेच होतं. त्यानंतर या तरुणाला काय करावे हेच सुचले नाही.

त्यानंतर ही परिस्थिती हाताळत तरुणीने नवऱ्याला सांगितले की, योनीप्लास्टीच्या शस्त्रक्रियेमुळे तिच्या शरीरात बदल झाले. इमोशनल ब्लॅकमेलिंगचा सट्टा चालवणाऱ्या नववधूने सांगितले की, तिने याबाबत दुसऱ्या कोणाला सांगितले तर ती आत्महत्या करेल.

या घटनेनंतर घाबरलेल्या मुलाने आधी मौन बाळगले आणि हे रहस्य त्याने कोणालाही सांगितले नाही. पण सत्य फार काळ लपत नाही. लग्नाला इतकी वर्षे होऊनही मूल न झाल्याबद्दल नातेवाईक आणि मित्रमंडळींनी तिला सतत अनेक प्रश्न विचारले अखेर एके दिवशी तिचा धीर सुटला आणि तिने रडत रडत घरच्यांना सर्व प्रकार सांगितला.

त्यानंतर सुनेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि नंतर या तरुणाने लगेचच घटस्फोट मागितला. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याच वेळी, नात्यातील या आश्चर्यकारक प्रकरणाबद्दल ज्या कोणी ऐकले, तो चक्रावून गेला आहे.

First published:

Tags: Shocking news, Social media, Top trending, Viral, Wife and husband