जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अपघातात चालकाची भयाण अवस्था; हा VIDEO पाहून तुम्ही सीट बेल्टशिवाय गाडीच चालवणार नाही

अपघातात चालकाची भयाण अवस्था; हा VIDEO पाहून तुम्ही सीट बेल्टशिवाय गाडीच चालवणार नाही

भीषण अपघाताचा Video

भीषण अपघाताचा Video

अनेक अपघातांचे व्हिडीओ समोर आले आहेत. अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यामुळे वारंवार रस्त्यावर चालताना, गाडी चालवताना काळजी घेण्याचं, सावधान राहण्याचं सांगितलं जातं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 एप्रिल : दिवसेंदिवस अपघात होण्याचे प्रमाण वाढलं आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत चालल्याचं पाहून रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या आणि पायी चालणाऱ्या सर्वांनाच सतर्क राहण्याचं, हेल्मेट घालण्याचं, सीटबेल्ट लावण्याचं आवाहन केलं जातं. जेणेकरुन अपघात झाला तरी जास्त इजा होणार नाही. तरीही अनेक लोक या नियमांचं पालन करत नाहीत आणि अपघातात गंभीर जखमी होतात. अशीच एक भीषण अपघाताची घटना सध्या समोर आली आहे जी पाहून तुम्हालाही जाणवेल की सीटबेल्ट लावणं किती गरजेचं असतं. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक अतिशय भीषण अपघात होताना दिसत आहे. ज्यामध्ये चालकाच्या चुकीने मोठा अपघात होतो आणि कार रस्त्याच्या कडेला उडी मारून बाजूला पडते आणि वेग जास्त असल्याने चालकाला कार नियंत्रणात ठेवता येत नाही आणि कार उलटते. कार रस्त्यावरून पलटून साईडला जाते तेव्हा ती कोणत्याही नियंत्रणाशिवाय हवेत उडते. यादरम्यान कारचा दरवाजा उघडतो आणि सीट बेल्ट न लावल्यामुळे ड्रायव्हर अनेक फूट हवेत उंचीवर उडून रस्त्यावर पडताना दिसतो.

News18लोकमत
News18लोकमत

हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. @ViciousVideos नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 11 सेकंदांचा हा भयावह व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगालवर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

जाहिरात

दरम्यान, यापूर्वीही अनेक अपघातांचे व्हिडीओ समोर आले आहेत. अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यामुळे वारंवार रस्त्यावर चालताना, गाडी चालवताना काळजी घेण्याचं, सावधान राहण्याचं सांगितलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात