मुंबई, 25 जुलै : भारतातील बहुतांश भागात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचलमध्ये तर दरड कोसळणे आणि पुर परस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असेल. दिल्लीमध्ये ही खूप वाईट परिस्थीती आहे. येथील रस्त्यावर पाणीच पाणी झालं आहे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्ही तेथील भयाण परिस्थीतीचा अंदाजा लावू शकता. हिंडनमध्ये आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. कर्हेरा येथील नऊ वसाहतींमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. घरांमध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले आहे. नदीकाठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांना घरे खाली करून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. एकट्या करहेरा येथील सुमारे 12 हजाार कुटुंबांना प्रशासनाने तयार केलेल्या निवाऱ्यात किंवा नातेवाईकांकडे जाण्याचे आवाहन केले जात आहे. पावसाळ्यात घरात माश्या का येतात? यामागे आहेत 5 महत्वाची कारणं सोमवारी रात्रीपासून हिंडण नदीला पूर आला असून, त्यामुळे करेडा परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थीती दरम्यान, दोन मुले घरातून निघून गेली होती, मात्र रात्रीपासून ते घरी परतले नाहीत, त्यानंतर एनडीआरएफ तसेच जिल्हा अधिकारी आणि गाझियाबाद पोलिस सातत्याने शोध मोहीम राबवत आहेत. दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. एका मुलाचे वय 16 वर्षे असून त्याचे नाव क्रिश आहे आणि दुसऱ्याचे नाव आदर्श आहे त्याचे वय 18 वर्षे आहे.
#WATCH | Noida, UP: Due to an increase in the water level of Hindon River, the area near Ecotech 3 got submerged due to which many vehicles got stuck. pic.twitter.com/a5WOcLCH02
— ANI (@ANI) July 25, 2023
या घटनेनंतर रडून कुटुंबाची अवस्था बिकट झाली आहे. कर्हेडा भागात पुरानंतर एनडीआरएफचे पथक बचावकार्य करत आहे. पुरामुळे अनेकांच्या वाहनांनी जलसमाधीचे स्वरूप धारण केले आहे. सध्या प्रशासन या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. तेथील भयाण परिस्थीदाखवण्यासाठी समोर आलेला व्हिडीओ पुरेसा आहे. हा व्हिडीओ एका पार्किंग लॉटमधली आहे. जेथे तुम्ही पाहू शकता की जवळ-जवळ संपूर्ण कारच पाण्याखाली बुडाली आहे. कारचा थोडा वरचा भागच आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ एएनआयने आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे.