वुहान, 17 मार्च : कोरोनामुळे साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. या विषाणूनं हजारो लोकांचा जीव घेतला आहे, तर लाखो लोकांना याची लागण झाली आहे. भारतातही या विषाणूने शिरकाव केला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील देश एकत्र येऊन लढत असले तरी, यावर अद्याप ठोस उपाय सापडलेले नाहीत. त्यामुळं रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्यावर लोकांचे आयुष्य अवलंबुन आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी घरदार सोडून सध्या डॉक्टर आणि नर्स काम करत आहेत. अशाच एका आईचा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना 24 तास काम करावे लागत आहे. त्यामुळं जवळजवळ महिनाभर त्यांना घरापासून आणि मुला बाळांपासून दूर रहावे लागत आहे. अशाच एका तब्बल महिनाभरानंतर घरी परतलेल्या आईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नर्स तब्बल महिन्याभराने घरी परतली असता, तिला येता पाहूनच माय-लेकाला अश्रू अनावर झाले. मुलाने आईला कडकडून मिठी मारल्याचा व्हिडीओ नेटकऱ्य़ांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. वाचा- अरे देवा आणखी एक कोरोना साँग! शाहरुखच्या ‘सुनो ना…‘चं नवं व्हर्जन, पाहा VIDEO
Boy embraces mother after her return from #COVID19 front line pic.twitter.com/F8gXGgIJgZ
— CGTN (@CGTNOfficial) March 16, 2020
वाचा- कोरोनापेक्षा TRP वर प्रेम, ‘तारक मेहता’च्या निर्मात्याने केली अजब मागणी या व्हिडीओमध्ये मुलगा आईला येताना पाहून धावत तिला भेटतो, आणि कडकडून मिठी मारतो. आपल्या मुलाच्या मिठीमुळे आईलाही अश्रू अनावर झाले. माध्यमांशी बोलताना त्याच्या आईने सांगितले की 29 दिवस त्या घरी आल्या नव्हत्या. अशीच परिस्थिती सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. काही ठिकाणी लोकांना घरी काम करण्यास सांगितले जात आहे, तर वैद्यकीय क्षेत्रातील लोक दिवस-रात्र रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी झटत आहेत.