मुंबई 4 डिसेंबर : सोशल मीडिया हे व्हिडीओचं भंडार आहे. तुम्ही एकदा का येथे आलात की तुमचा वेळ कसा निघून जाईल हे तुमचं तुम्हालाच कळणार नाही. येथे असंख्या मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ हे धक्कादायक असतात, तर काही व्हिडीओ हे इतके मनोरंजक असतात की, हसून हसून पोटात दुखू लागले. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ देखील असाच आहे.
काही लोकांना काही अशा गोष्टी करण्याची सवय असते, जे बऱ्याचद्या त्यांच्या अंगाशी येतं किंवा त्याचा त्यांना त्रास होतो. असंच काहीसं एका तरुणासोबत घडल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.
हे ही पाहा : एक सिंह आणि 14 म्हशी, कोणाची होईल शिकार? Video पाहा आणि तुम्हीच ठरवा
या व्हिडीओच्या सुरुवातील रस्त्याच्या कडेला काही बदकाची गोंडस पिल्लं दिसत आहेत. तिथेच थोड्या अंतरावर दोन बदक देखील उभे आहेत.
तेव्हा एक तरुण बदकांची गोंडस पिल्ले पाहाण्यासाठी आणि त्यांचे फोटो काढण्यासाठी त्यांच्या जवळ जातो. तो पिल्लांना हात लावणार इतक्यात त्या पिल्लांच्या आईने म्हणजे मादी बदकाने हे पाहिलं आणि ती लांबून पळत त्या तरुणाजवळ आली आणि तिने त्याच्यावर अटॅक केला.
इतक्यात तो तरुण तेथून पळाला, पण असं असलं तरी देखील बदकाने त्या तरुणाची पाठ सोडली नाही आणि तो तरुणाच्या पाठी धावू लागला.
हे ही पाहा : मगरीचं नशीब खराब की हरणाचं नशीब चांगलं? Viral Video पाहून तुम्हाला काय वाटतं?
हे सगळं या तरुणाच्या मित्राने त्याच्या कॅमेरात कैद केलं आहे आणि हा व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट देखील केला.
Never mess with someone’s kids. pic.twitter.com/303sjDcHsL
— UOldGuy🇨🇦 (@UOldguy) November 30, 2022
हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, कोणाच्या ही मुलांशी पंगा घेऊ नका.
या व्हिडीओला भरभरुन लाईक्स आणि शेअर मिळाले आहेत. अनेकांनी आपल्या अकाउंटवरुन देखील या मजेदार व्हिडीओला शेअर केलं आहे. तुम्हाला देखील हा व्हिडीओपाहून हसू आवरणार नाही. दिवसभराचा थकवा विसरायला लावणारा हा एक मजेदार व्हिडीओ आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Social media, Top trending, Videos viral, Viral