नवी दिल्ली 16 जुलै : जंगलात दोन प्राण्यांची जीवघेणी लढाई तुम्ही अनेकदा पाहिली असेल. यासोबतच लोकांच्या घरातील पाळीव कुत्रा आणि मांजर या दोन प्राण्यांमध्येही अनेकदा भांडणं पाहायला मिळतात. पण तुम्ही कधी पक्षी आणि मांजर यांच्यातील भांडण पाहिलं आहे का? अनेकदा खेड्यापाड्यात मांजर पक्ष्यांच्या पिल्लांची शिकार करून त्यांना खाताना दिसतात. मात्र आता एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये बदक आणि मांजर यांच्यात भांडण पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने भांडताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. यात दिसतं की एका बदकाने मांजरासोबत मस्ती करण्याचा विचार केला, त्यानंतर मांजरीने बदकाला असा धडा शिकवला की हा व्हिडिओ व्हायरल झाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक बदक घरात झोपलेल्या मांजरीला आपल्या चोचीने मारत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर मांजर तिथून निघून जाऊ लागते.मात्र, बदक पुन्हा तिच्या मागे लागतो आणि यावेळी मांजरीचं डोकं चोचीने पकडतो. यामुळे मांजराच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडते.
Duck fight pic.twitter.com/2MVAJlb3bk
— Animal (@wildanimalpis) July 9, 2023
इतकं होऊनही बदक शांत होत नाही आणि मांजरीवर हल्ला करतच राहातो. शेवटी मांजरीने आपल्या पंजाने बदकाला मारून त्याला आपल्यापासून दूर केलं. त्यानंतर बदक पुन्हा अनेक वेळा मांजरीला मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रत्येक वेळी मांजर तिच्या पायाने बदकाला मारते, हे खूपच मजेदार दिसतं. Viral Video : गाडीची काच फोडून घोडा आत घुसला, Video पाहून लावाल डोक्याला हात यानंतर, बदक पुन्हा मांजरीच्या पायाला चोचीने पकडते. मग मांजर पुन्हा खाली पडते आणि बदकाला मारू लागते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप बघितला जात आहे. यूजर्स या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, ‘यामध्ये काही मजेदार नाही, कारण दोघे खेळत नाहीत तर खरंच भांडत आहेत’.