नवी दिल्ली, 16 जुलै : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ समोर येत असतात. यामध्ये अनेक निरनिराळ्या प्रकारचे व्हिडीओ पहायला मिळतात. घोड्याचे अनेक फोटो व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. नाचताना, झोपताना, पळताना, असे घोड्याचे व्हिडीओ पाहिले असतील. मात्र तुम्ही कधी रस्त्यावर गाडीच्या काचेत शिरलेला घोडा पाहिलाय का? असाच एक घोड्याचा व्हिडीओ सध्या समोर आलाय ज्यामध्ये तो गाडीच्या मागच्या बाजूनं अडकला आहे. हा व्हिडीओ नेमका काय आहे याविषयी जाणून घेऊया. एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये कारच्या मागच्या बाजूला घोडा अडकला आहे. घोडा गाडीमध्ये अडकताच रस्त्यावर लोकांची त्याला पहायला भरपूर गर्दी पहायला मिळाली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या मधोमध एक घोडा कारच्या मागे अडकल्याचं दिसत आहे. हा घोडा पूर्णपणे शांत आणि स्थिर आहे. इतका शांत घोडा तुम्ही पाहिला नसेल. व्हिडिओमध्ये कारची मागील काच तुटलेली दिसत असून घोड्याचे पुढचे दोन्ही पाय आत शिरले आहेत. घोडा वाईटरित्या अडकला आहे. घोड्याने त्या गाडीच्या मागच्या बाजूला उडी मारली असावी आणि त्याचा पाय काच फोडून गाडीच्या मागच्या बाजूला अडकला,असा अंदाज लोक लावत आहेत.
@jackykumar874 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ काही वेळातच इंटरनेटवर व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना पहायला मिळत आहेत. व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे स्पष्ट झालं नाही. मात्र व्हिडीओ जोरदार चर्चेत आला आहे.