धरतीपासून दूर आकाशात जन्मलं बाळ; आईने नाव ठेवलं SKY

धरतीपासून दूर आकाशात जन्मलं बाळ; आईने नाव ठेवलं SKY

बाळाचा अशा ठिकाणी जन्म होणं हा तिच्यासाठी एक वेगळा अनुभव होता आणि ते कायम लक्षात राहवं म्हणून या महिलेनं बाळाचं नाव sky ठेवलं आहे.

  • Share this:

अलास्का, 13 ऑगस्ट  :  आतापर्यंत पृथ्वी, आकाश नाव तुम्ही ऐकलं आहे. निसर्गातील विविध गोष्टींच्या नावावरून मुलांचीही नावं ठेवली जातात, त्यात नवं काही नाही. निसर्गातील गोष्टींचा अर्थ सोडता ती नावं ठेण्यामागे तसं दुसरं काही कारण नसतं. मात्र अलास्कामध्ये एका महिलेनं आपल्या बाळाचं नाव स्काय (SKY) असं ठेवलं आहे आणि त्याला कारणही तसंच आहे.

हे बाळ उंचावर आकाशात जन्माला आलं म्हणजे विमानात त्याचा जन्म झाला. म्हणून त्याच्या आईने त्याचं नाव स्काय असं ठेवलं आहे. एपी न्यूजने KTUU-TV चा हवाला देत हे वृत्त दिलं आहे.

क्रिस्टल हिक्स असं या महिलेचं नाव आहे. क्रिस्टल 35 आठवड्यांची गरोदर होती. आपल्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यासाठीच ती विमानाने निघाली होती. 5 ऑगस्टला ग्लेन्नालालेनहून ती अलास्काला जात होती. मध्यरात्रीचा एक वाजला होता. विमानातच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला.

क्रिस्टल म्हणाली, "एका तासातच माझं बाळ जन्मलं. सुरुवाताली धक्काच बसला, थोडं विचित्र वाटलं, काहीच सूचत नव्हतं. मात्र प्रत्येक जण बाळाबाबत बोलत होतं"

हे वाचा - डेअरिंग लव्ह! कतरिनाच्या होकारासाठी स्टंटमनने खरंच दिली अग्निपरीक्षा; पाहा VIDEO

क्रिस्टल आणि तिच्या बाळाला सुरक्षितरित्या अलास्कातील रुग्णालयात आणण्यात आलं. बाळाला सर्वात आधी ब्रिथिंग मशीनवर ठेवलं कारण बाळ प्रसूतीच्या वेळेआधीच ते जन्माला आलं होतं.

अशा वेगळ्या पद्धतीने त्याचा जन्म झाला होता. तिच्यासाठीही हा एक वेगळा अनुभव होता. मात्र ती जन्मदाखल्यावर तर आपल्या बाळाच्या जन्माचं ठिकाण विमान, आकाश असं नोंदवू शकत नव्हती. मात्र त्याची जन्मदाखल्यावर नोंद राहावी आणि हा क्षण कायम लक्षात राहावा म्हणून तिनं आपल्या मुलाचं नाव स्काय ठेवलं आहे.

क्रिस्टल म्हणाली, "बाळाच्या जन्मदाखल्यात माहिती भरणं खूपच कठिण होतं. कारण जवळपास 18,000 फूट उंचावर बाळ जन्माला आलं होतं. बाळ विमानात, आकाशात जन्माला आलं असं मी जन्मदाखल्यासाठी देऊ शकत नव्हतं. त्यामुळे मी त्याचं जन्मस्थळ आँकरेज असंच लिहिलं"

हे वाचा - मुलांच्या डोळ्यांना सातत्याने येणारी सूज; किडनीच्या गंभीर आजाराचं लक्षण

क्रिस्टलला आधी तीन, नऊ आणि अकरा वर्षांची अशी मुलं आहेत आणि स्काय हे तिचं चौथं मूल आहे. पुढील आठवड्यात बाळाला डिस्चार्ज दिला जाणार आहे.

Published by: Priya Lad
First published: August 13, 2020, 9:13 PM IST

ताज्या बातम्या