मराठी बातम्या /बातम्या /देश /सॅल्युट! स्वतःचा ऑक्सिजन मास्क काढून डॉक्टरने 71 वर्षांच्या रुग्णाचे वाचवले प्राण

सॅल्युट! स्वतःचा ऑक्सिजन मास्क काढून डॉक्टरने 71 वर्षांच्या रुग्णाचे वाचवले प्राण

अॅनेस्थेटिस्टला बोलावून तो PPE किट घालून ऑक्सिजनची नळी लावेपर्यंत मौल्यवान वेळ गेला असता, हे ओळखून ICU मध्ये दाखल असलेल्या डॉ. मेहतांनी जे केलं ते पाहून तिथला मेडिकल स्टाफही अवाक झाला.

अॅनेस्थेटिस्टला बोलावून तो PPE किट घालून ऑक्सिजनची नळी लावेपर्यंत मौल्यवान वेळ गेला असता, हे ओळखून ICU मध्ये दाखल असलेल्या डॉ. मेहतांनी जे केलं ते पाहून तिथला मेडिकल स्टाफही अवाक झाला.

अॅनेस्थेटिस्टला बोलावून तो PPE किट घालून ऑक्सिजनची नळी लावेपर्यंत मौल्यवान वेळ गेला असता, हे ओळखून ICU मध्ये दाखल असलेल्या डॉ. मेहतांनी जे केलं ते पाहून तिथला मेडिकल स्टाफही अवाक झाला.

सुरत, 13 ऑगस्ट : स्वतःचे प्राण धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे या साथकाळातलं ऋण मोठं आहे. पण आज अक्षरशः सुपरहिरोला लाजवेल असं काम एका डॉक्टरनं करून दाखवलं. स्वतः रुग्णशय्येवर असताना त्यांनी दाखवलेली कर्तव्यतत्परला पाहून तुम्हीही त्यांना त्रिवार सलाम कराल.

स्वतः ऑक्सिजन सपोर्टवर असताना शेजारी गंभीर रुग्ण आलेला पाहून कुठलाही विचार न करता स्वतःच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करून त्या तडफडणाऱ्या रुग्णाला ऑक्सिजन दिला. सुरतच्या डॉ. संकेत मेहता यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल त्यांचं देशभरात कौतुक होत आहे.

डॉ. मेहता अॅनास्थेटिस्ट आहेत. COVID-19 पॉझिटिव्हचं निदान झाल्यानंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि ते स्वतः सुरतमधल्या BAPS हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांना ऑक्सिजन सपोर्ट देण्यात येत होता, पण प्रकृती स्थिर होती.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 9 ऑगस्टला त्यांच्या बाजूच्या बेडवर एक अत्यवस्थ रुग्ण आणण्यात आला. 72 वर्षांच्या या वृद्धाची प्रकृती नाजूक होती आणि त्याला तातडीने ऑक्सिजन सपोर्ट लावण्याची गरज होती, हे लक्षात येत होतं. ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यासाठीच्या नळ्या अॅनेस्थेटिस्ट लावतात. रुग्णालयात त्या क्षणी उपस्थित असणाऱ्या अॅनेस्थेटिस्टला बोलावून तो PPE किट घालून तयार होईपर्यंत अत्यंत महत्त्वाचा वेळ गेला असता. या दहा मिनिटांच्या काळात रुग्णाचा प्राण जायची शक्यता होती. बाजूच्या बेडवर असलेल्या डॉ. मेहता यांना झटकन परिस्थितीचा अंदाज आला आणि त्यांनी कर्तव्यतत्परता दाखवत झटकन निर्णय घेतला. स्वतःच्या चेहऱ्यावरचा ऑक्सिजन मास्क दूर करत त्यांनी त्या अत्यवस्थ रुग्णाला क्षणात नळ्या जोडून ऑक्सिजन पुरवठा सुरू केला.

बाजूला उपस्थित असणारा ICU स्टाफही डॉ. मेहतांच्या या धैर्याकडे अवाक होऊन पाहात होता.

अत्यवस्थ रुग्णाला पहिल्या पाच ते दहा मिनिटात ऑक्सिजनचा पुरवठा मिळाला नाही तर त्याचे प्राण धोक्यात येतात. रुग्णाचा मेंदू कायमचा निकामी होऊन रुग्ण कोमात जायची शक्यता असते. ती वेळ जीवरक्षक आणि मौल्यवान असते. हे ओळखून स्वतः ICU मध्ये असलेल्या डॉ. मेहतांनी स्वतःचा मास्क काढून रुग्णाचं प्राण वाचवलं.

टाइम्सच्या बातमीनुसार डॉ. मेहतांची तब्येत सध्या स्थिर आहे. पण गेले 10 दिवस ते कोविडवर उपचार घेत आहेत. त्यांनी प्राण वाचवलेले 71 वर्षांचे  दिनेश पुरानी नावाचे वृद्ध रुग्ण अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Surat