नवी दिल्ली 14 जुलै : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की माकडही बऱ्याचदा माणसांसारखी काही कृत्य करू लागतात. काही लोक दारूच्या नशेत गोंधळ घालतात तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. मात्र आता माकडाने असं केल्याचं समोर आलं आहे. दारू पिऊन एका माकडाने असं काही केलं की सगळेच हैराण झाले. नशेत असलेल्या माकडाने काही महिन्यांतच हजारो लोकांवर हल्ला केला आहे. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये ही बाब समोर आली आहे. माकडाच्या हल्ल्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात दुखापतही झाली आहे. काठमांडू येथील एका रुग्णालयात (STIDH) माकडाने हल्ला केलेल्या लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये एका नऊ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. काठमांडू पोस्टशी बोलताना हल्ल्यातील एका पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, गेल्या दोन ते तीन महिन्यांत केवळ एका माकडानेच 4000 लोकांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. Video Viral: विशालकाय अजगरावर बसला चिमुकला मग जबड्यात हात घातला अन्.., थरकाप उडवणारा घटना असं सांगितलं जात आहे की, जे माकड लोकांवर हल्ला करायचं ते जवळच्या दुकानात जायचं. तिथे मद्यपान करणाऱ्या लोकांसोबत हे माकडही मद्यपान करू लागलं. काही लोकांनी दारूचा ग्लास भरून मजा म्हणून माकडाला द्यायला सुरुवात केली आणि आता त्याचा परिणाम लोकांना भोगावा लागत आहे. लोकांनी सांगितलं की ते माकड खूप दारू पिऊन आक्रमक झालं आणि आता तो लहान मुलांनाही चावू लागलं आहे. STIDH डेटानुसार, कुत्र्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर माकड चावल्याची सर्वाधिक प्रकरणं नेपाळमध्ये समोर येत आहेत. गेल्या 14 वर्षांच्या नोंदी तपासल्या तर असं कळतं की नेपाळमध्ये जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये माकड चावण्याच्या सर्वाधिक घटना नोंदल्या जातात. याचा अर्थ या महिन्यांत माकडे अधिक आक्रमक होतात. माकड चावण्याच्या बहुतेक घटना मंदिरांच्या बाहेर घडतात. कारण माकड यालाच आपलं घर मानतात. या मंदिरांपैकी एक आहे बौद्ध मंदिर स्वयंभूनाथ, जिथे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या माकडांच्या चाव्यामुळे संसर्गाची प्रकरणे समोर येण्याची भीती डॉक्टरांना आहे. याचं कारण म्हणजे ही माकडं लोकांना रेबीजची शिकार बनवू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.